Marathi Jokes : मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती, वाचा बॉलीवूड जोक्स

एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो.

धर्मेद्रला जाग येते आणि

तो सवयीप्रमाणे ओरडतो, कुत्ते…कमीने…

चोर शांतपणे म्हणतो, ठिक आहे, कमी नेतो…!


मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती.

तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला.

भिकारी – ताई, एक रुपया द्या.

मल्लीकाने त्याला एक हजार रुपये दिले.

तिच्या सेक्रेटरीने विचारले,

त्या भिकार्‍याला एक हजार रुपये का दिलेस?

मल्लीका म्हणाली – पहिल्यांदाच कोणीतरी ताई म्हणाले…

Marathi Jokes : Viral bollywood jokes in marathi trending marathi jokes

Follow us on

Sharing Is Caring: