Marathi Jokes : सासू आणि सुनेचे खळखळवून हसवणारे जोक्स

एकदा एका स्रीला देव प्रसन्न होतात.
देव – एक वरदान माग.
स्री – मला तीन वरदान पाहिजेत.
देव – ठीक आहे, पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल…?
स्री – कोणती…?
देव – मी तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन.
(देवाला वाटले ती स्री निरुत्तर होईल.)
स्री – चालेल.
देव – मग ठीक आहे, माग वरदान…
स्री – मला सर्वात सुंदर बनव.
देव – तथास्तु…
(इकडे सासू दहापट सुंदर होते.)
स्री – मला भरपूर संपत्ती द्या.
देव – तथास्तु…
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट संपत्ती जास्त मिळते.)
स्री – मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या.
देव – तथास्तु…
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट हार्ट अटॅक येतो. सासू सरळ वर…)
आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते.


नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते,
“हे बघ आजपासून तू मला आई म्हणायचं,
आणि तुझ्या सासऱ्याना बाबा म्हणायचं…!”

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो,
तेव्हा ती म्हणते…
“आई, दादा आला…”
(पोरग चक्कर येऊन पडल राव)

Marathi Jokes : Sasu suneche marathi jokes whatsapp viral trending joes in marathi

Follow us on

Sharing Is Caring: