नवरा:तुला माहीत आहे का?? काल आमचे बॉस कोमात गेले.
बायको: त्यांचं काय बाई पैशेवाले लोक आहेत ते. सुट्टीत कुठेपण जातील.
आपल्यासारखं आहे का, सारखं घरात घरात….
एका मुलाने लायब्ररीतल्या एका मुलीला विचारलं, “मी तुझ्या शेजारी बसलो तर तुझी काही हरकत आहे काय?”
मुलीने मोठ्याने उत्तर दिले,
“मला तुझ्याबरोबर रात्र घालवायची नाही.”
लायब्ररीतले सर्व विद्यार्थी त्या मुलाकडे पाहू लागले. त्याला स्वतःची भयंकर लाज वाटली.
काही मिनिटांनंतर ती मुलगी शांतपणे त्या मुलाच्या टेबलाकडे गेली आणि म्हणाली,.
“मी मानसशास्त्राचा अभ्यास करते आणि मला माहित आहे की एक पुरुष कसा विचार करीत असतो. माझी खात्री आहे माझ्या उत्तरानं तुला स्वतःचीच लाज वाटत असेल!”
त्यावर तो मुलगा ताडकन उभा राहिला आणि तिच्यापासून दूर जात म्हणाला, “
“फक्त एका रात्रीसाठी दहा हजार रुपये? हे फारच जास्त आहे.”
लायब्ररीतले सर्वजण त्या मुलीकडे शॉक बसल्यासारखे पाहू लागले. मुलगा हळूच तिच्या कानात कुजबूजला..
“मी कायद्याचा अभ्यास करतो आणि एखाद्याला पेचात कसं पकडावं हे मला चांगले माहित आहे.”
Marathi Jokes : New Viral jokes in marathi whatsapp share jokes in marathi