केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून बरोबर सहाला घरी जाणार म्हणजे जाणार.
बॉस : का?
कर्मचारी: एक तर आॅफीस मधे आधी इतके काम नसतं.
आणि वाढत्या महागाईमुळे इतक्या कमी पगारात माझे भागत नाही. म्हणून मी रात्री रिक्षा चालवणार आहे.
बाॅस: बरं, ठीक आहे. पण रात्री तुला भूक लागेल तेव्हा हायवेवरील चौकात येत जा.
कर्मचारी : का? बॉस.
बाॅस: मी रात्री तिथे चायनीज फुडची गाडी लावतो.
गुरुजी: – गण्या भारत कधी स्वतंत्र झाला
गण्या : – लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर
Marathi Jokes : Jokes in Marathi funny viral marathi jokes for friends