Marathi Jokes : डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?

एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो. नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते. रुग्ण: अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला.

नर्स: काय तहान लागली आहे का?

रुग्ण: (वैतागून) नाही…गळा लिकेज आहे का ते बघायचंय.


डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?

रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.

रुग्ण: तेच तर केले होते.


नवरा: अग ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी

अख्ख शहर बदलून टाकीन, मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र

बदलून टाकीन आणि पंतप्रधान केलं तर पूर्ण देश बदलून टाकीन. बायको: तुम्हाला कोणी चावलं की काय?

लय बडबडताय. हे बदलीन, ते बदलीन… दारू कमी प्या…

लुंगी समजून माझा परकर घातलाय तो बदला आधी

Marathi Jokes : Funny whatsapp Jokes in marathi Latest viral marathi jokes

Follow us on

Sharing Is Caring: