Connect with us

जेथे उभे राहणे देखील कठीण तेथे 30 वर्षा पासून एका दगडाच्या खाली 9 लोकांचे कुटुंब आनंदात राहत आहे

People

जेथे उभे राहणे देखील कठीण तेथे 30 वर्षा पासून एका दगडाच्या खाली 9 लोकांचे कुटुंब आनंदात राहत आहे

टेक्सास मध्ये राहणारे हे कुटुंब जगातील सर्वात अनोखे आहे. 9 लोकांचे हे कुटुंब एका अश्या जागी राहते जेथे व्यवस्थित उभे राहणे देखील कठीण आहे. खरतर हे कुटुंब एका अश्या जागी राहतात जेथे त्यांच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. येथे ना वीज आहे ना पाणी तरी देखील बेनिटो हर्नांडिज नावाचा हा व्यक्ती मागील 30 वर्षा पासून येथे राहत आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या 7 मुलांना लहानाचे मोठे येथेच केले आहे. हे लोक येथे एक खास प्रकारची वनस्पती उगवतात, ज्यावर ते आपले घर चालवतात.

ज्या मोठ्या दगडाच्या खाली हे 9 लोकांचे कुटुंब राहते हे शहरा पासून अनेक किलोमीटर दूर एका वाळवंटी भागात आहे. अनेक वर्षापासून येथे राहणारे बेनीटो आणि त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की त्यांना येथे अत्यंत आराम आणि शांती मिळते. ते म्हणतात, ‘आम्हाला अजून कोठे ही जायचेच नाही’

वाळवंट असल्याने त्यांच्याकडे पाणी आणि वीज नाही तरी देखील ते आपले दैनिक काम सहज करतात. पाण्याची व्यवस्था थोड्या दूर वर वाहणारा झरा पूर्ण करतो. तर प्रकाश आणि अन्न बनवण्यासाठी ते लाकडावर जळणारी चूल वापरून पूर्ण करतात.

हर्नांडिज सांगतात त्यांनी जवळच शेती करून काही वनस्पती आणि पिक उगवले आहे. आता ते येथे एक अशी वनस्पती उगवतात ज्यामधून एक खास प्रकारचे वैक्स निघते. हे वैक्स चूइंगम, कफ सिरप सारख्या वस्तू बनवण्यासाठी उपयोगी येते. हर्नांडिज हे विकून आपले कुटुंब चालवतात.

8 वर्षाचे असताना हर्नांडिज येथे आले होते

हर्नांडिज सांगतात ते याजागी मजबुरी म्हणून नाही तर आवड म्हणून राहत आहे. हर्नांडिज जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हा मेक्सिको मधील एका भागात राहत होते. ते एकदा येथे फिरण्यासाठी आले आणि त्यांना ही जागा एवढी आवडली की त्यांनी येथे आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतला. कामाच्या निमित्त ते जवळपासच्या शहरात जात असत, तेव्हा त्यांना एका महिले सोबत प्रेम झाले. त्यांनी तिच्यासोबत लग्न केले आणि ते आनंदाने या विशिष्ट जागी जीवन जगत आहेत.

तुम्हाला आवडेल का अश्या जागी आपले जीवन जगण्यास. तुमचे मत काय आहे कमेंट मध्ये लिहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top