Connect with us

तनुश्री दत्ता नंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला आपला अनुभव

Celebrities

तनुश्री दत्ता नंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला आपला अनुभव

तनुश्री दत्ता सोबत झालेल्या सेक्शुअल हैरेसमेंट चे प्रकरण अजून थंड झालेले नाही आणि अजून एक अभिनेत्रीने इंडस्ट्री मधील वाईट प्रवृत्ती बद्दल आपले तोंड उघडले आहे. फिल्म ‘लव सोनिया’ आणि ‘हंटर’ मध्ये एक्टिंग केलेली आणि मराठी मध्ये अनेक चित्रपट केलेली अभिनेत्री सई ताम्हणकरने हल्लीच कास्टिंग काउच बद्दल आपली शांतता मोडली आहे. जगभरात चाललेल्या #MeToo कैम्पेन अंतर्गत सई म्हणते एकदा तिला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून प्रोड्युसर आणि डायरेक्टर सोबत झोपण्यासाठी ऑफर दिली होती.

असे आहे पूर्ण प्रकरण

बातमी अनुसार सई ने सांगितले, एकदा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने मला सांगितले माझ्याकडे एक फिल्म आहे, पण यासाठी तुला एक काम करावे लागेल. मी विचारले काय काम आहे. तर त्याने सांगितले, तुला प्रोड्युसर आणि डायरेक्टर सोबत झोपावे लागेल.

तसे तर सामान्यतः फिल्मच्या हिरो सोबत झोपावे लागते, पण तुला हे काम प्रोड्युसर आणि डायरेक्टर सोबत करायचे आहे. सई ने पुढे सांगितले, यानंतर मी त्याला जोरदार उत्तर देत म्हणाले, तू आपल्या आईला झोपण्यासाठी का नाही पाठवत. माझे उत्तर ऐकल्या नंतर 10 सेकंद तो काही बोलला नाही. या नंतर मी त्याला म्हणाले तुला आता समजले असेल आता परत मला फोन करू नकोस. यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मला कधी फोन केला नाही. सई अनुसार तुम्हाला याविरुध्द आवाज उठवला पाहिजे, जे तुम्हाला चुकीचे वाटते.

फिल्म मध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांना मिळणाऱ्या मानधनातील फरका विषयी देखील सई बोलली आहे. तिच्या म्हणण्या अनुसार पुरुष अभिनेत्याला अभिनेत्री पेक्षा जास्त पैसे दिले जातात. पण आता हळूहळू परस्थिती बदलत आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top