lovePeople

सुप्रीम कोर्टाने बंधनकारक केले आहे मैरिज सर्टिफिकेट, ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही आहे पद्धत

तुमचे लग्न झालेले आहे किंवा तुम्ही लवकरच लग्न करण्याच्या विचारात असाल तरी या दोन्ही परस्थिती मध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही ते म्हणजे मैरिज सर्टिफिकेट. लग्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुप्रीम कोर्टाने मैरिज सर्टिफिकेट बनवणे बंधनकारक केलेले आहे. आता देशातील अनेक राज्यांमध्ये मैरिज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑनलाईन होत आहे. विवाहित जोडप्यासाठी मैरिज सर्टिफिकेटची आवश्यकता पासपोर्ट मध्ये वैवाहिक स्टेट्स अपडेट करताना, ज्वाइंट होम लोन घेताना, ज्वाइंट बैंक अकाऊंट ओपन करताना आणि कपल वीजा घेण्यासाठी पडते.

मैरिज सर्टिफिकेट काय आहे

मैरिज सर्टिफिकेट हे आधिकारिक स्टेटमेंट आहे, ज्या अंतर्गत दोन व्यक्तींना विवाहित मानले जाते. देशामध्ये विवाहास हिंदू मैरिज एक्ट 1955 आणि स्पेशलमैरिज एक्ट 1954 अंतर्गत रजिस्टर केले जातात. हा एक कायदेशीर प्रुफ असतो कि तुम्ही विवाहित आहेत.

सुप्रीम कोर्टाने मैरिज सर्टिफिकेट केले बंधनकारक

साल 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने विवाहास रजिस्टर करणे बंधनकारक बनवले आहे. सुप्रीम कोर्टाने महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदू एक्ट मध्ये मैरिज रजिस्ट्रेशन बंधनकारक केले आहे.

कोठे बनवली जात आहे मैरिज ऑनलाईन सर्टिफिकेट

मैरिज सर्टिफिकेट कोर्ट आणि राज्य सरकारच्या वेबसाईटवर जाऊन बनवू शकता. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तराखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान सारखे राज्ये आपल्या राज्य सरकारच्या वेबसाईटवर जाऊन मैरिज सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरू शकता. सगळ्या राज्यामध्ये मैरिज सर्टिफिकेट बनवण्याची प्रोसेस जवळ पास एक सारखीच आहे.

मैरिज सर्टिफिकेट बनवण्याची ही आहे प्रोसेस

महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन मैरिज सर्टिफिकेट बनवण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही खालील लिंकवर जाऊन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करू शकता.

महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटची लिंक पुढील प्रमाणे आहे :

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2495

या लिंकवर गेल्या नंतर स्क्रीनवर येणाऱ्या इंस्ट्रक्शन फॉलो करा.

खालील प्रक्रिया दिल्ली सरकारच्या रेवेन्यु डिपार्टमेंट ई-डिस्ट्रिक्टच्या वेबसाईट वरील आहे. परंतु जवळपास त्या प्रमाणेच प्रक्रिया इतर सगळ्या ठिकाणी आहेत.

आपली सगळी माहिती भरा आणि ‘र‍जिस्ट्रेशन ऑफ मैरिज सर्टिफिकेट’ वर क्लिक करा. फॉर्म डाऊनलोड होईल. तुम्ही या मध्ये सगळ्या डिटेल भरा आणि अप्वाइंटमेंटची तारीख निवडा. सबमिट बटन वर क्लिक करून एप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.

तुम्हाला एक टेम्परेरी नंबर मिळेल. हा टेम्परेरी नंबर अक्नोलेजमेंट स्लिप देखील राहील. तुम्ही आपला एप्लिकेशन फॉर्म आणि अक्नोलेजमेंट स्लिपची प्रिंट काढण्यास विसरू नका. एप्लिकेशन फॉर्मचे काम झाले.

अप्वाइंटमेंट मध्ये एड्रेस प्रूफ, जन्माचा दाखला पती पत्नी दोघांचा, दोन पासपोर्ट साईज फोटो दोघांचे, एक लग्नाचा फोटो, आधार कार्ड हे सगळे कागदपत्रे सेल्फ अटेस्टेड असावीत तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना लग्न पत्रिका लागते त्याच प्रमाणे अप्वाइंटमेंट मध्ये साक्षीदार घेऊन जावे जो तुमच्या विवाहा मध्ये उपस्थित होता.

अप्वाइंटमेंट मध्ये सगळे फाइनल झाल्या नंतर जेव्हा तुमचे एप्लिकेशन अप्रूव होईल, तेव्हा तुम्ही पोर्टलवर जाऊन एप्लिकेशन नंबर टाकून मैरिज सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

अधिक माहिती मिळवण्यासाठी कोर्टामध्ये संबंधित अधिकाऱ्यास किंवा महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला भेट द्यावी ही विनंती.

Show More

Related Articles

Back to top button