Breaking News
Home / राशिफल / घराच्या मुख्य दरवाजावर अवश्य लावा या पाच वस्तू आणि काळजी घ्या या चार गोष्टींची

घराच्या मुख्य दरवाजावर अवश्य लावा या पाच वस्तू आणि काळजी घ्या या चार गोष्टींची

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरातील वास्तू बरोबर असेल तेव्हा घरात नेहमीच आनंद आणि समृद्धी असते.वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून घराचे मुख्य प्रवेशद्वार खूप महत्वाचे आहे. लोक यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर अनेक शुभ वस्तू लावतात. मुख्य दारावर कोणत्या गोष्टी स्थापित केल्या पाहिजेत ते आपण समजू या, याचा परिणाम घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांवर होतो.

तोरण : घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी पिंपळ, आंबा आणि अशोक यांच्या पानांची माळ किंवा तोरण बनवून घराच्या मुख्य दरवाजा वर बांधणे शुभ असते असे मानले जाते.

देवी लक्ष्मी : घराच्या प्रवेश द्वारावर लक्ष्मी-कुबेर यांचा फोटो लावणे शुभ असते. वास्तू अनुसार असे केल्याने धन लाभ होतो.

लक्ष्मीची पाऊले : घराच्या मुख्य दरवाजावर कुंकूने माता लक्ष्मीची पावले बनवण्यामुळे घरात धन-दौलत आणि समृद्धी यांचे आगमन होते.

शुभ लाभ : घराला नकारात्मक आणि वाईट उर्जे पासून वाचण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला शुभ-लाभ लिहणे चांगले मानले जाते.

स्वास्तिक : हिंदू धर्मात स्वास्तिक अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यात स्वास्तिकचे चिन्ह बनवून पूजा-पाठ संपन्न केला जातो. प्रवेश द्वारावर स्वास्तिकचे चिन्ह बनवण्यामुळे घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी यामध्ये वाढ होते.

काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

१. घराचा मुख्य दरवाजा हा घरातील इतर दरवाजा पेक्षा मोठा ठेवला पाहिजे. तसेच हा दरवाजा दोन्ही बाजूने उघडणारा असला पाहिजे.

२. घराचा दरवाजा उघडताना यागोष्टीकडे लक्ष द्या कि त्यामध्ये आवाज येत नसावा. हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे. दरवाजातून आवाज येत असल्यास त्यांना त्वरित दुरुस्त करून घ्यावे.

३. प्रवेश द्वारावर नेहमी चांगला प्रकाश असणे आवश्यक आहे.

४. घराच्या प्रवेश द्वारावर सुंदर आणि स्वच्छ सरळपणे लिहिलेली नावाची पाटी असावी. यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते.

About V Amit