Uncategorized

महाभारत युद्ध होण्या अगोदर श्रीकृष्ण ने अर्जुनाला दिले होते जन्म-मृत्यू संबंधी ज्ञान

महाभारत युद्ध होण्या अगोदर अर्जुनाने जेव्हा भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि आपले कुटुंबातील सदस्य पाहिले तेव्हा त्याने धनुष्य बाण ठेवून दिले आणि युद्ध न करण्या बद्दल श्रीकृष्णाला सांगितले. तेव्हा श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. गीते मध्ये दिलेले ज्ञान आज देखील आपल्या जीवनातील अनेक समस्याच दूर करू शकतात. जाणून घेऊ गीते मधील काही चर्चित श्लोक आणि त्यांचे अर्थ..

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

हा गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक आहे आणि अत्यंत प्रचलित आहे. या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे कि फक्त कर्मावर तुझा अधिकार आहे, पण कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही आहे. त्यामुळे कर्माच्या फळाची चिंता नाही केली पाहिजे. या श्लोकामध्ये कर्माचे महत्व सांगितले आहे. आपल्याला फक्त कर्मावर लक्ष दिले पाहिजे. पूर्ण इमानदारीने आपले काम करावे. वाईट कामापासून वाचावे.

नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत॥

हा देखील द्वितीय अध्यायातील श्लोक आहे. यामध्ये सांगितले गेले आहे कि आत्म्याला कोणतेही शस्त्र कापू शकत नाही. आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही. श्रीकृष्णाने सांगितले कि आत्मा शरीर बदलते, कधी मरत नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यावर शोक नाही केला पाहिजे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

हा गीते मधील चतुर्थ अध्यायातील श्लोक आहे. यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात कि सृष्टी मध्ये जेव्हा-जेव्हा धर्माची हानी होते म्हणजेच अधर्म वाढतो, तेव्हा-तेव्हा मी धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतो. जे लोक अधर्म करतात, परमेश्वर त्यांचा संहार करतात, त्यामुळे धर्माच्या अनुसार काम केले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button