astrology

14 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या सकाळी अंघोळ करताना पाण्या मध्ये टाका ही 1 वस्तू ज्याने होईल लक्ष्मी प्राप्ती

यावेळी 14 फेब्रुवारीला देशभरामध्ये महाशिवरात्री आहे. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा त्यांचे पूर्ण श्रद्धेने त्यांची पूजा करतात. हे तुम्हाला माहीत असेलच की प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते पण वर्षात 2 वेळा येणाऱ्या शिवरात्रीचे महत्व थोडे जास्तच असते. वर्षातील दोन महत्वाच्या या शिवरात्री वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. एक शिवरात्री श्रावण मासात येते तर दुसरी फाल्गुन मासात येते.

यावेळीची शिवरात्र फार मोठा महासंयोग बनवत आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत जो तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी केला तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही धनवान होण्यास मदत होईल. तुम्हाला हा उपाय 14 फेब्रुवारीला सकाळी अंघोळ करताना करायचा आहे. चला तर पाहू काय आहे हा उपाय.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले एका वाटी मध्ये किंवा लहान भांड्यात पाणी घ्यायचे आहे आणि नंतर त्या पाणी भरलेल्या वाटीला तुम्हाला देवा समोर (घरातील देवघर किंवा देवारा) ठेवायचे आहे. यानंतर तुम्हाला ही पाण्याची वाटी देवा समोरून उचलून आपल्या आपल्या हातात घेऊन आपल्या सर्व समस्या हळूहळू बोलायच्या आणि नंतर या वाटी मध्ये 3 वेळा फुंकर मारायची आहे.

यानंतर या वाटीतील पाणी चांगले उकळवा आणि यामध्ये 1 छोटी आणि 1 मोठी इलायची टाका. आता हे पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यात एकत्र करा. लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. तुम्हाला काही दिवसातच याचे सकारात्मक परिणाम दिसतील. हा उपाय केल्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दररोज घरामध्ये करा हे छोटेछोटे उपाय, दूर होईल घरातील नकारात्मक उर्जा


Show More

Related Articles

Back to top button