माधुरी दीक्षितचा मुलगा आरिन झाला 16 वर्षांचा, पहा किती स्मार्ट दिसतो

माधुरी दीक्षित बॉलिवूड मधील एक आघाडीची अभिनेत्री राहिली आहे. तिच्या सौंदर्याचे आणि सुंदर स्मीतहास्याचे लाखो लोक चाहते होते आणि आहेत. माधुरी दीक्षित सध्या बॉलीवूड पासून थोडीफार दूर झालेली असलेली तरी टीव्हीवर रियालिटी शो मध्ये जज म्हणून आपल्या भेटीला येत असते.

माधुरी दीक्षित ने 1999 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर श्रीराम नेने यांच्या सोबत विवाह केला. आपल्या माहितीसाठी जेव्हा श्रीराम नेने यांच्या सोबत माधुरीचा विवाह झाला होता तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती कि माधुरी भारता मध्ये एवढी मोठी स्टार आहे.

विवाहा नंतर माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांना दोन मुले झाली आहेत. ज्यांची नावे आरिन आणि रेयान आहेत. माधुरी नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या मुलांचे फोटो शेयर करत असते.

हल्लीच माधुरी ने सोशल मीडियावर आपला मुलगा आरिन याचा एक फोटो पोस्ट केला होता. फोटो शेयर करताना माधुरी ने लिहिले होते कि तिला विश्वास बसत नाही कि वेळ एवढ्या वेगाने जात आहे. माधुरीच्या मोठ्या मुलाचे नाव आरिन आहे. आरिन हल्लीच 16 वर्षांचा झाला आहे.

माधुरी नेहमी बोलते कि तिने मुलांना चांगले संस्कार दिले आहेत आणि तिची इच्छा आहे कि तिच्या मुलांनी स्टारडम पेक्षा दूर राहावे. अमेरिकेत लहानाचा मोठा झालेला आरिनचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. तो ज्यांना भेटतो त्यांना आपल्या स्वभावाने आपलेसे करतो.