People

8 वर्षाच्या मुलासह आई-वडील मृत अवस्थेत, तुम्ही देखील एसी वापरत असाल तर बातमी नक्की वाचा

चेन्नई मध्ये एक कुटुंब रात्री झोपले असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी जेव्हा कुटुंबातील लोक दुध आणि वर्तमानपत्र उचलण्यासाठी घराच्या बाहेर आले नाही हे पाहून शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. जेव्हा पोलीस दरवाजा तोडून घरामध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिले केली घरामध्ये पती-पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा मृत अवस्थेत होते.

पोलिसांच्या प्रमाणे जेव्हा ते रूम मध्ये गेले तेव्हा तो रूम चारी बाजूने बंद होता आणि पतीपत्नी आणि मुलगा मृत अवस्थेत होते. यामागील कारण एसी मधून विषारी गैस बाहेर आल्याचे सांगितले गेले आहे.

पोलिसांच्या अनुसार रात्री परिसरातील वीज गेली होती ज्यामुळे कुटुंबाने इन्वरटर सुरु केला. काही वेळाने वीज पुन्हा आली, पण खराब एसी मुळे विषारी गैस रूम मध्ये पसरला. रूम चारी बाजूने बंद असल्यामुळे तिघेही मरण पावले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

एसी मधून विषारी किंवा ज्वलनशील गैस जसे अमोनिया, मिथाइल क्लोराइड किंवा प्रोपेन गैस लिक होण्याची शक्यता असते, ज्यामुळे घातक दुर्घटना होऊ शकतात. यासाठी वेळोवेळी एसीची सर्विस केली पाहिजे. ज्यामुळे धूळ-माती स्वच्छ होऊ शकेल आणि पाणी बाहेर जाईल. त्याच सोबत ज्या रूम मध्ये एसी सुरु असेल त्याचे खिकडी दरवाजे अधूनमधून उघडावे ज्यामुळे शुध्द ताजी हवा आणि सूर्यप्रकाश रूम मध्ये येऊ शकेल.


Show More

Related Articles

Back to top button