Weight Loss

वजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन

सध्या लोकांना सर्वात मोठी आरोग्य विषयक कोणती समस्या असेल तर ती वजन वाढणे हि आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे बहुतेक लोक हे वजन वाढल्यामुळे हैराण झालेले आहेत. जर व्यक्तीचे वजन वाढले तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर त्याला अनेक आजार होण्याची शक्यता देखील वाढते. शरीराचे वजन कमी करण्यासाठी बहुतेक वेळा लोक अनेक उपाय करतात परंतु हे सर्व करून देखील त्यांचे वजन कमी होत नाही. जर कोणाला 5 किलो वजन कमी करायचे असेल तरी आणि एखाद्याला 15 किलो कमी करायचे असेल तरी त्रास हा सहन करावाच लागतो. अनेक वेळा डाइटिंग आणि व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही पण तुम्हाला माहीत आहे का सकाळच्या रुटीन मध्ये थोडा बदल करणे तुमच्या वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना यश मिळवून देऊ शकते. होय हे खरे आहे जर तुम्ही आपल्या सकाळच्या रुटीन मध्ये काही बदल केले तर ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात.

वाचा : Weight Loss Tips in Marathi

चला पाहू आपले वजन कमी करण्यासाठी काय केले पाहिजे

ब्रेकफास्ट

वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट आवश्यक आहे. दिवसभराच्या खाण्यामध्ये सकाळचा नाश्ता सर्वात महत्वाचा आहे एका अभ्यासात समजले आहे कि हाई प्रोटीन ब्रेकफास्ट केल्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाहीत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते. जर तुम्ही हाइप्रोटीन वाला ब्रेकफास्ट केला तर यामुळे तुम्हाला भूक लागण्याची समस्या होणार नाही तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला हाई प्रोटीन ब्रेकफास्ट जसे अंडे चीज नट्स इत्यादी सेवन करू शकता ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल.

 

पाण्याचे सेवन

जसेकी सगळ्यांनाच माहित आहे कि पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे यासाठी भरपूर प्रमाणात पाणी सेवन केले पाहिजे. तुम्ही सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास पाणी सेवन करू शकता यामुळे तुमच्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होईल.

व्यायाम

आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे जर तुम्हाला चांगले आरोग्य पाहिजे असेल तर दिवसाची सुरुवात व्यायाम करून केली पाहिजे. यामुळे फक्त तुमचे शरीर निरोगी राहील असे नाही तर वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल. जर तुम्ही सकाळी व्यायाम केला तर दिवसभर ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहते विशेषतः डायबेटीसच्या रुग्णांनी सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले व्यायाम केला पाहिजे.

पुरेशी झोप घेणे

वजन वाढण्याचा आणि झोपेचा जवळचा संबंध आहे जे व्यक्ती रात्री व्यवस्थित झोपत नाहीत त्यांना वजन वाढण्याचा त्रास अधिक जास्त होतो. व्यवस्थित पुरेशी झोप न घेतल्यामुळे शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलाच्यामुळे शरीराचे वजन वाढण्यास सुरुवात होते कारण जे लोक रात्री उशिरा पर्यंत जागरण करतात ते काही ना काही खात पीत असतात ज्यामुळे शरीराचे वजन वाढते. यामुळे जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर रात्री पुरेशी झोप घ्यावी.


Tags
Show More

Related Articles

Back to top button