health

1 महिन्यात 3 किलो वजन कमी करण्यासाठी लसणाची रेसेपी

वजन वाढणे एक गंभीर समस्या आहे आणि वजन वाढल्यामुळे अनेक मोठ्या आजारांचे ते कारण होऊ शकते. वजन वाढणे ही काही अभिमान करण्याची गोष्ट नाही आहे. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वजन वाढल्यामुळे याचा परिणाम तुमच्या कॉन्फिडेंस वर होतो. अनेक अभ्यासातील सर्वेक्षणात असे समजले आहे की कॉन्फिडेंस कमी होण्यासाठी वजन वाढणे हे देखील अनेक कारणां पैकी एक कारण असू शकते.

तसेच वजन वाढल्यामुळे हाई ब्लडप्रेशर, मधुमेह, सांधेदुखी, कोरोनरी विकार, हाई कोलेस्ट्रोल, अपचन इत्यादी प्रोब्लम होऊ शकतात.

Weight Loss Tips – वजन कमी करण्यासाठी हे करा

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चांगल्या जीवनशैलीचा वापर करावा लागेल. यामध्ये वजन कमी करणाऱ्या उपायांना शामिल करावे लागेल. एक प्राचीन घरगुती उपाय आहे जो तुम्हाला एका महिन्यात जवळपास 3 किलो वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतो. चला पाहू काय आहे तो उपाय.

सामग्री :

2-3 लसून कळ्या

मध – 1 मोठा चमचा

हा उपाय काम कसे करते

तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फक्त हा उपाय तुमचे वजन कमी करणार नाही तर यासोबत तुम्हाला संतुलित आहार आणि रोज कमीतकमी एक तास व्यायाम करावा लागेल. पण तुम्हाला व्यायाम आणि डायट करायचा नसेल तर   व्यायाम आणि डायट नाही केला तरी 100% वजन कमी करण्याचा उपाय करू शकता.

लसणा मध्ये एक घटक असते ज्याला एलिकीन म्हंटले जाते, हे तुमच्या पचनशक्तीला वाढवू शकते. यामुळे फैट कोशिका जलद गतीने बर्न होण्यास मदत होते. याच सोबत यामध्ये एंती ओक्सिडेंट असते जे जमलेल्या फैट कमी करण्यास मदत करते.

कृती :

लसणाचे सालटे काढून त्यांना बारीक कापून त्यामध्ये मध मिक्स करा आणि याची पेस्ट तयार करा. पेस्ट व्यवस्थित मिक्स करा. दररोज सकाळी ही पेस्ट एक महिना रिकाम्या पोटी खावी. तुम्हाला गरज भासल्यास हा उपाय तुम्ही एक महिन्या नंतर देखील पुढे चालू ठेवू शकता. पण लक्षात ठेवा यासोबत व्यायाम आणि संतुलित आहार गरजेचा आहे.


Show More

Related Articles

Back to top button