Uncategorized

लिवरच्या समस्येवर रामबाण उपाय

Liver च्या खराबीचा योग्य वेळी इलाज केला नाही तर पुढे याचे रुपांतर विक्राळ समस्ये मध्ये होऊ शकते, एवढेच नाही तर यामुळे जीव देखील जाऊ शकतो. लिवर कमजोर होणे किंवा लिवर खराब होणे या समस्येचे अनेक कारणे असू शकतात. लिवर मध्ये वेदना होणे, भूक कमी लागणे इत्यादी हे या आजाराची सामान्य लक्षणे आहेत.

लिवर मध्ये सूज आल्यामुळे अन्न आतड्यांमध्ये योग्य पद्धतीने पोहचत नाही आणि व्यवस्थित पचन होत नाही. व्यवस्थित पचन नाही झाल्यामुळे इतर रोग उत्पन्न होऊ शकतात. यासाठी लिवर खराबीवर सोप्पा आणि पूर्णपणे आयुर्वेदिक उपाय आज आम्ही येथे सांगत आहोत ज्यामुळे लिवर खराबी मध्ये आराम मिळू शकतो.

कधी कधी असे होते कि आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होतात ज्यांना आपण दुर्लक्षित करतो. यामध्ये लिवरची खराबी देखील एक आहे. लिवर खराब होण्याचे अनेक कारण असू शकतात ज्यामध्ये प्रमुख कारण अतिशय जास्त मद्यपान करणे, जेवणामध्ये मसालेदार भोजन जास्त करणे आणि अजूनही अनेक कारणे असू शकतात. जसे जर तुमचे पोट जास्त वाढले असेल तर तुम्ही विचार करता कि हे वजन वाढल्यामुळे असेल.

कदाचित तुम्हाला माहित नसेल कि लिवर खराब होण्यामुळे देखील पोटावर जास्त सूज येते ज्यामुळे पोट फुगलेले दिसते. यासर्व गोष्टीं लक्षात घेऊन हा लेख लिहित आहोत.

चला पाहू लिवर खराब झाल्याची लक्षणे

चेहऱ्यावर दाग

कधीकधी चेहरा पिवळा पडतो आणि चेहऱ्यावर पांढरे दाग पडतात. जर तुमच्या सोबत देखील असेच काही होत असेल तर हे चांगले संकेत नाही आहेत. अश्या स्थितीत त्वरित डॉक्टरांसोबत संपर्क करा.

डोळे पिवळे होणे

जर डोळ्याचा पांढरा भाग पिवळा दिसायला लागला असेल तर हि चिंतेची बाब आहे. डोळे पिवळे पडण्याकडे दुर्लक्ष करू नका. याचे रुपांतर गंभीर समस्ये मध्ये होऊ शकते. लिवर खराब झाल्यामुळे डोळे पिवळे दिसतात आणि नखांवर देखील पिवळेपणा दिसतो.

चव न येणे

जर तुम्हाला जेवणात चव लागत नाही. जेवणाची टेस्ट मिळमिळी लागते. तुम्हाला खाण्याची इच्छा होत नाही असे जर होत असेल तर दुर्लक्ष करू नका. लिवर मध्ये एक एन्जाइम असते ज्यास बाईल म्हणतात जे अतिशय कडू असते. लिवर खराब झाल्यावर बाइल तोंडा पर्यंत पोहचते ज्यामुळे तोंडाची टेस्ट बिघडते.

तोंडाची दुर्गंधी

तोंडामध्ये अमोनियाचे प्रमाण वाढल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. लिवर मध्ये खराबी झाल्यामुळे असे होते, तोंडाच्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करू नका हि समस्या गंभीर स्वरूप घेऊ शकते.

थकलेले डोळे आणि डार्क सर्कल

जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवते तुम्ही रात्री कितीही झोप घेतली तरी झोप पूर्ण होत नाही. डोळ्याभोवती डार्क सर्कल होतात आणि डोळे सुजायला लागतात हे चांगले संकेत नाही आहेत.

पचन शक्ती कमकुवत

लिवर खराब होण्याचा सगळ्यात मोठा संकेत तुमची पचनक्रिया बिघडणे. जर तुम्ही जास्त मिरची मसाले खाल्ले तर छाती मध्ये जळजळ होते. हे पचनशक्ती खराब झाल्याचे आणि लिवर प्रोब्लेमचे संकेत आहेत.

लिवरच्या समस्येवर घरगुती उपाय

एक कागदी लिंबू (चांगला पिकलेला) घ्या आणि त्याचे दोन तुकडे करा. अर्ध्या लिंबूचे चार भाग करा पण त्यांना पूर्ण वेगवेगळे करू नका. त्यानंतर एका भागात काळी मिरीचे चूर्ण, दुसऱ्यात काळे मीठ (किंवा सेंधव मीठ), तिसऱ्यामध्ये सुंठ चूर्ण आणि चवथ्यात साखर किंवा खडीसाखर भरा. रात्री एका प्लेटमध्ये ठेवून झाकून ठेवा. सकाळी भोजन करण्याच्या एक तास अगोदर लिंबूचे तुकडे मंद आचेवर किंवा तव्यावर गरम करून चोकून घ्या.

काही विशेष

1. आवश्यकतेनुसार 15 दिवस ते 21 दिवस घेतल्याने लिवर चांगले होते.

2. यामुळे यकृत विकार ठीक होण्याच्या सोबत पोटदुखी आणि तोंडाची टेस्ट ठीक होते, भूक वाढते, डोकेदुखी आणि जुने बद्धकोष्ठता दूर होते.

3. हे यकृत कडक आणि लहान होणे या समस्येवर अचूक आहे. जुना मलेरिया, ताप, अधिक मद्यपान, अधिक मिठाई खाणे इत्यादी कारणामुळे यकृत रोग उत्पन्न होतात. ताप येऊन गेल्या नंतर लिवरची समस्या राहते आणि ते पहिल्यापेक्षा मोठे आणि कठीण होते. गंभीर स्वरूप धारण केल्यास यकृत संकुचित होते. यकृत रोगामध्ये डोळे आणि बिघडलेली टेस्ट इत्यादी लक्षण दिसतात.

काही अन्य प्रभावी उपाय

1. दोन आठवडे साखर किंवा मिठाचा वापर करू नका. साखरे एवजी दुधामध्ये चार-पाच मनुके टाकावे यामुळे गोडवा येईल. पोळी देखील कमी खावी. जेव्हा उपचार सुरु असतात तेव्हा पोळी खाऊ नये. भाजी आणि फळे खावे. भाजीमध्ये मसाले टाकू नये. टमाटर, पालक, गाजर, कारले, दुधीभोपळा इत्यादी शाकाहारी भाजी आणि पपई, आवळा सेवन करा. तूप तसेच तळलेल्या वस्तूंचे सेवन कमीतकमी करा. यामुळे समस्या 15 दिवसात ठीक होईल.

2. लिवर संकुचित झालेले असेल तर दिवसातून दोन वेळा कांदे खाण्यामुळे देखील फायदा होतो.

3. ताक (हिंग टाकून फोडणी दिलेले, जीरा, काळीमिरी आणि मीठ टाकून) दुपारी भोजन केल्यानंतर सेवन करणे फायद्याचे ठरते.

4. आवळ्याचा रस 25 ग्राम किंवा सुकलेल्या आवळ्याचा चूर्ण 4 ग्राम पाण्यासोबत दिवसातून तीन वेळा सेवन केल्याने 15-20 दिवसात यकृताचे सर्व दोष दूर होतात.

5. शंभर मिली पाण्यात अर्धा लिंबूचा रस, मीठ, साखर टाकावे आणि यास दिवसातून तीन वेळा पिण्यामुळे लिवरची समस्या ठीक होते.

Tags

Related Articles

3 Comments

Back to top button