Connect with us

लीवरची समस्या आहे का? तर वापरा हे 5 आयुर्वेदिक उपाय

Health

लीवरची समस्या आहे का? तर वापरा हे 5 आयुर्वेदिक उपाय

लोकांच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैली या कारणामुळे लिवर संबंधित समस्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामध्ये एक फैटी लिवर समस्या आहे जर तुम्ही देखील फैटी लीवरच्या समस्ये पासून वाचू इच्छित असाल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही खाद्य पदार्थाला आपल्या डाइट समाविष्ट करून फैटी लीवर पासून वाचता येऊ शकते. हल्ली फैटी लीवर समस्येमुळे लोक त्रस्त आहेत. लीवर मध्ये जेव्हा फैटचे प्रमाण वाढते तेव्हा लीवरच्या कोशिकांचे काम प्रभावित होते ज्यामुळे लीवरच्या कोशिका व्यवस्थित काम करू शकत नाहीत आणि लिवरचे आकारमान वाढते जेव्हा लीवरचा आकार वाढतो त्यामुळे रक्ताची सफाई व्यवस्थित होत नाही ज्यामुळे लीवर संबंधित अनेक आजार होतात. यामुळे व्यक्तीची पाचन तंत्र खराब होते.

जर तुम्हाला वाटते कि लीवरच्या संबंधित समस्या पासून सुटका मिळवता येते त्यासाठी तुम्हाला दररोजच्या आपल्या डाइट वर विशेष लक्ष द्यावे लागेल त्यासाठी तुम्हाला काही खाद्य पदार्थ आपल्या डाइट मध्ये समावेश करावा लागेल. चला पाहू कोणते खाद्य पदार्थ तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात.

जवस (अलसी)

जर तुमच्या लिवर मध्ये काही समस्या असेल तर जवस सेवन करणे तुमच्या फायद्याचे होईल. आयुर्वेद मध्ये लीवर संबंधित समस्यांसाठी हा अचूक उपाय मानला जातो. तुम्ही रोज एक चमचा जवसचे सेवन पाण्या सोबत करावे यामुळे लीवर किंवा पचन संबंधित समस्या दूर होतील.

कारले

जर तुम्ही आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढू इच्छितात तर यासाठी कारले सेवन करावे यामुळे तुमची पचनक्रिया देखील व्यवस्थित राहील. याच सोबत शुगर लेवल पण कंट्रोल मध्ये राहील. तुम्ही तुमच्या आहारामध्ये आठवड्याच्या दोन दिवस कारले आवश्य समाविष्ट करा.

लिबू

तुम्ही लिंबू सेवन केले तर लीवर संबंधित समस्या सोबतच शरीराच्या इतर समस्या पासून देखील सुटका मिळवता येईल. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर राहील. जर कोणीही मद्यपान करत असेल तर त्याने लिंबू नक्की सेवन केले पाहिजे. तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबाचा रस टाकून याचे सेवन केले पाहिजे याच्या मदतीने फैटी लीवरची समस्या दूर होईल.

एप्पल व्हिनेगर

एप्पल व्हिनेगर सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते याच्या सेवनामुळे आपले लीवर मजबूत होते आणि फैट वाढत नाही. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा एप्पल व्हिनेगर टाकून रोज सेवन केले पाहिजे.

ग्रीन टी

जर तुम्ही ग्रीन टी सेवन केले तर ते तुमच्या लीवरसाठी चांगले राहील ग्रीन टी सेवन केल्यामुळे फैट कमी होते. तुम्ही दिवसातून दोन वेळा ग्रीन टी सेवन केल्यास तुमचे लीवर निरोगी राहील.

Trending

Advertisement
To Top