Connect with us

आत्ताच्या आत्ता पॅन-आधार लिंक करा नाहीतर 5 हजार रुपय दंड तयार ठेवा, येथून तुम्ही लिंक करू शकता

Money

आत्ताच्या आत्ता पॅन-आधार लिंक करा नाहीतर 5 हजार रुपय दंड तयार ठेवा, येथून तुम्ही लिंक करू शकता

पॅन-आधार लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 30 जून 2018 ही पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे अवघे काही तासच शिल्लक आहेत तुमचा पॅन-आधार लिंक करण्यासाठी.

आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत वाढवून देण्यास नकार दिला आहे आज पॅन आणि आधार लिंक केलं नाही तर ते रद्दही होऊ शकतं. तसंच तुम्हाला ५ हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर 31 जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासही तुम्हाला अनेक बाबींचा सामना करावा लागेल. आयकर विभागाने ही तारीख वाढविण्यास नकार दिलाय. केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत बँक अकाउंट, पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी 30 जून ही डेडलाइन दिलेली आहे. आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.

या लिंकवर जाऊन करा लिंक

https://portal.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaa…

ही लिंक ओपन केल्यानंतर आलेला फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तुमचा पॅन कार्डनंबर हाच तुमचा आयडी असतो. हा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मोबाईल आणि मेल आयडीवर ओटीपी(वन टाईम पासवर्ड) येईल. हा ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top