Dharmik

दिवाळीच्या रात्री या 5 ठिकाणी लावा 1 दिवा, होईल धनवर्षा

दिवाळी हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. मान्यते अनुसार लक्ष्मी माता या दिवशी भ्रमण करण्यास निघते आणि आपल्या भक्तांना आनंद वाटते. दिवाळी मध्ये आपण धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करतो. दिवाळीच्या तारखा हिंदू पंचांगा अनुसार ठरतात. पण साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा सण येतो.

का साजरी करतात दिवाळी

दिवाळी बद्दल सर्वात लोकप्रिय कथा प्रभू रामचंद्र यांची आहे. माता सीतेचे अपहरण करणाऱ्या रावणाचा वध करून चौदा वर्षांनी प्रभू राम अयोध्या मध्ये परतले होते. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या आनंदात पूर्ण अयोध्या नगरी तसेच तेथील लोकांनी आपली घरे दिवे लावून प्रकाशित केली होती. त्यादिवसा पासून दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण साजरा केला जातो.

 

या 5 ठिकाणी आवश्य लावा दिवे

असे मानले जाते कि माता लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करण्यास येते आणि या दिवशी माता ज्या व्यक्तीच्या घरात निवास करते त्यांना कधी पैश्यांची कमी होत नाही. माता लक्ष्मीची कृपा त्याच्यावर नेहमी राहते. त्यामुळे लोक या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे लावून सजवतात. पण काही लोकांना हे माहित नाही कि घरामध्ये कोठे कोठे दिवे लावले पाहिजेत. काही खास ठिकाणी दिवे लावल्यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. चला तर पाहू दिवाळीच्या दिवशी घरामध्ये कोठेकोठे दिवे लावले पाहिजेत.

 

  1. दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवा आवश्य लावा. मान्यते अनुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये देवतांचा वास असतो. यामुळे येथे दिवा लावणे शुभ मानले जाते.
  2. असे मानले जाते कि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचे आगमन होते. यासाठी दिवा लावताना घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवा लावला पाहिजे.
  3. जर तुमच्या घराच्या आसपास मंदिर असेल तर तेथे जाऊन देखील एक दिवा आवश्य लावला पाहिजे. असे केल्यास पूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.
  4. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला सुनसान जागा असेल तर तेथे देखील एक दिवा लावा. शक्य असल्यास हा दिवा चार रस्ते एकत्र येतात तेथे लावा.
  5. जर तुमच्या घराला आंगण असेल तर तेथे देखील दिवा लावण्यास विसरू नका. आंगणात दिवा लावल्यामुळे तुमचे दुर्भाग्य दूर होईल आणि माता लक्ष्मी कृपा करेल. घराच्या आंगनामध्ये एक मोठा दिवा लावा आणि त्यामध्ये रात्रभर पुरेल एवढे तूप टाका.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close