Breaking News

9 वर्षा च्या मुलाने एका वर्षात कमवले 200 करोड रुपये, हे सोप्पे काम करतो एवढे पैसे कमवण्यासाठी…

9 वर्षाच्या मुलांसाठी त्याचे हे वय खेळण्यासाठी आणि शिक्षणासाठी असते. पण काही मुले या वयात देखील कमाई करायला सुरुवात करतात. एक असाच मुलगा आहे रेयान.

रेयान (Ryan Kaji) या मुलाने आपल्या वयाच्या 6 व्या वर्षा पासूनच कमाई करणे सुरु केले होते. तुम्ही विचार करत असाल कि 9 वर्षांचा मुलगा असे कितीसे पैसे कमवत असेल.

पण रेयान ची कमाई (Ryan Kaji Income) समजल्यावर तुम्हाला आश्चर्य होईल. त्याची कमाई शेकडो मध्ये नाही तर करोडो मध्ये आहे.

फोर्ब्स (forbes) ने अश्या लोकांची लिस्ट बनवली होती ज्यामध्ये यू-ट्यूब (YouTube) च्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई केलेले लोक समाविष्ट होते.

Forbes च्या लिस्ट मध्ये ज्या व्यक्तीने सगळ्यात जास्त 200 करोड रुपये कमाई या 9 वर्षाच्या मुलाने म्हणजेच रेयान ने केली होती. रेयान यू-ट्यूब वर आपले व्हिडीओ अपलोड करतो आणि करोडो रुपये कमावतो.

फोर्ब्स च्या लिस्ट मध्ये वर्षात सगळ्यात जास्त यू-ट्यूब मधून कमाई (YouTube Channel Income) करणाऱ्या लोकांच्या लिस्ट मध्ये रेयान चे नाव सगळ्यात वर होते. रेयान ने एका वर्षात यू-ट्यूब मधून 30 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 220 करोड रुपये इनकम केली.

रेयान काजी (YouTuber Ryan Kaji) मागील अनेक वर्षा पासून करोडो रुपये कमाई करत आहे. रेयान 3 वर्षाच्या वयापासून युट्युब वर व्हिडीओ शेयर करत आहे. त्याच्या युट्युब व्हिडीओ वर भरपूर व्ह्यूज आणि लाईक्स आहेत.

Ryan’s World या नावाचे रेयान चे यू-ट्यूब चैनल आहे. यावर 2000 पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड आहेत. ज्यांना लोक अतिशय आवडीने पाहतात. Ryan’s World चैनल वर 3 करोड पेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत. प्रत्येक व्हिडिओला करोडो व्ह्यूज मिळतात ज्यामुळे त्यास मोठी कमाई होते.

रेयान अमेरिकेतील टैक्सास (Texas) मध्ये राहतो आणि 2015 मध्ये त्याने आपला पहिला व्हिडीओ अपलोड केला होता. रेयान आता स्टोर बिजनेस मधून देखील कमाई करत आहे. त्याने वोलमार्ट सोबत देखील एक डील साइन केली होती, जेथून तो आता आपले प्रोडक्ट विक्री करेल.

रेयान आपल्या यू-ट्यूब चैनल वर खेळण्यांचे रिव्यू व्हिडीओ पोस्ट करतो. रेयान खेळण्यांना अनबॉक्सिंग आणि त्यास खेळतांना एक व्हिडीओ बनवून युट्युब वर अपलोड करतो. रेयान चे नाव मागील 3-4 वर्षा पासून फोर्ब्स च्या लिस्ट मध्ये समाविष्ट होत आहे.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.