आरोग्यदायी, घनदाट आणि चमकदार केसांसाठी अनेकजण नारळाचे तेल वापरतात. पण या तेलात थोडा कपूर मिसळून लावल्यास त्याचे परिणाम आणखी प्रभावी ठरू शकतात. हे मिश्रण केसांना मुळापासून पोषण देतं, तुटणं कमी करतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं.
डँड्रफ आणि खाजेवर नियंत्रण
कपूरामध्ये असलेले अँटीफंगल व अँटीसेप्टिक गुण स्कॅल्पवरील बुरशी आणि जीवाणूंना आळा घालतात. नारळाचे तेल कोरडेपणा कमी करून त्वचा मऊ आणि ओलसर ठेवते. त्यामुळे डँड्रफ, खाज किंवा इतर स्कॅल्प इन्फेक्शन असल्यास नारळाच्या तेलात कपूर टाकून हलकी मसाज केल्याने मोठा आराम मिळतो.
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर
नारळाच्या तेलात कपूर मिसळून मसाज केल्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण वाढल्याने केसांची वाढ नैसर्गिकरित्या वेगाने होते. याशिवाय, कपूर हेअर फॉल कमी करून केसांच्या मुळांना आवश्यक पोषण पुरवतो, त्यामुळे केस अधिक मजबूत होतात.
उवांपासून आराम
लहान मुलांच्या केसांत उवा झाल्यास नारळाचे तेल आणि कपूराचे मिश्रण प्रभावी ठरते. कपूराचा तीव्र सुगंध व थंडावा उवा नष्ट करण्यात मदत करतो. या मिश्रणातील नैसर्गिक आम्ले उवा हटवण्यासाठी खास कार्य करतात.
Disclaimer: या लेखातील माहिती ही सामान्य माहिती म्हणून दिली आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.















