india vs Australia 2nd Test : भारतीय क्रिकेट संघाचा T20 स्टार सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) याने झटपट क्रिकेटमध्ये जबरदस्त करियर केली आहे परंतु तो एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे चमक दाखवू शकला नाही.
त्याला वनडे फॉरमॅटमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा उठवता आला नाही आणि कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले तेव्हा त्याने सगळ्यांना निराश केले. टीम इंडियामध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे आणि याच कारणामुळे दुसऱ्या कसोटी मधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने मंगळवारी 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळी असा निर्णय दिला, त्यानंतर सूर्यकुमार यादवची कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी निवडकर्त्यांनी संघाची निवड केली तेव्हा सूर्यकुमार यादवचे नाव यामध्ये असल्याने चाहते खुश होते. त्याला या फॉरमॅटमध्ये संधी देण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. सूर्यकुमार यादवलाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली पण त्याचा फायदा उठवण्यात तो पूर्णपणे अपयशी झाला.
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला नागपूर कसोटीत संधी मिळाली. ही एक संधी त्याच्यासाठी शेवटची संधी होती पण त्याने ती वाया घालवली. खडतर परिस्थितीत मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवसाठी हिरो बनण्याची संधी होती, मात्र तो यश मिळवू शकला नाही.
बीसीसीआयने मंगळवारी 14 फेब्रुवारी रोजी दिल्ली कसोटी सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्त झाल्यानंतर पुनरागमनाची माहिती शेअर केली. दुखापतग्रस्त फलंदाज आता पूर्णपणे तंदुरुस्त असून दिल्लीत संघात सामील होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
श्रेयस अय्यर संघात सामील झाला म्हणजे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. बीसीसीआयने या खेळाडूला दुखापतीनंतर संघात सामील करण्याचा निर्णय घेतला असून फिटनेस लक्षात घेतला आहे. बोर्डाने उचललेले हे पाऊल म्हणजे सूर्यकुमार यादवचा कसोटी खेळण्याचा मार्ग बंद झाल्यासारखे वाटते.
सूर्यकुमार यादवने तंदुरुस्त होऊन पुनरागमन करणे ही चांगली बातमी नाही. यावेळी त्याच्यासाठी कसोटी संघात एकच जागा होती आणि ती श्रेयसमुळे रिकामी झाली होती. आता तो संघात परतला असल्याने कसोटी मालिकेत त्याला आणखी संधी मिळणे कठीण आहे हे निश्चित.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटीत सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. भारताने 151 धावांवर विराट कोहलीची विकेट गमावली होती आणि त्यानंतर त्याला मैदानात पाठवण्यात आले होते. अवघे 10 चेंडू खेळल्यानंतर तो 8 धावांवर 1 चौकार मारून नॅथन लियॉन मार्फत क्लीन बोल्ड झाला.