दररोजच्या केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती वाटते? दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स

Hair Care Tips in Marathi : दाट, लांब केसांसाठी जावेद हबीबच्या ७ टिप्स

Jawed Habib Hair Care Tips in Marathi : स्त्री असो वा पुरुष सुंदर केस हे दोघांना सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. पार्लरच्या ट्रिटमेंट्स, हिटींग टुल्सचा वापर, केमिकल्सयुक्त शॅम्पू यांमुळे केस गळणं सुरू होतं. उन्हाळ्याच्या दिवसात केसांमध्ये घाम जमा होऊन खाज येते तर कधी कोरडेपणामुळे केस गळायला लागतात. केस सुंदर चांगले ठेवण्यासाठी हेअरस्टायलिश जावेद हबीब यांनी काही खास उपाय सांगितले आहेत.

केसांना तेल लावणे

केसांना योग्य पोषण देण्यासाठी तेलानं मालिश करणं गरजेचं आहे. टाळूवर कोमट तेल लावल्यानंतर हाताच्या बोटांनी टाळूला हलक्या हाताने मालिश करा. मसाज केल्यानंतर केसांना गरम टॉवेल गुंडाळा आणि अर्ध्या तासानं केस स्वच्छ धुवून घ्या.

मालिश करा

टाळूची मालिश करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरू शकता. कोमट तेलाने मसाज करणे आपल्या केसांसाठी उत्तम आहे.

कंडीशनरचा वापर करा

केस चांगले ठेवण्यासाठी कंडिशनिंग हा महत्त्वाचा घटक आहे. हे ओलावा लॉक करते, कोरडेपणा प्रतिबंधित करते आणि घाण, प्रदूषण आणि काही प्रमाणात सूर्यापासून देखील संरक्षण करते.

ओले केस विंचरू नका

कोरड्या केसांच्या तुलनेत ओले केस जास्त ताणले जातात आणि सहज तुटतात. त्यामुळे तुमचे केस ओले असताना कंगवा करणे किंवा विचरणं टाळा.

केस ट्रिम करा

तुमचे केस अधिक वेळा ट्रिम केल्याने केसांची जलद वाढ होण्यास मदत होते. दर सहा ते आठ आठवड्यांनी तुमच्या केसांचा खालचा भाग ट्रिम केल्यास केस चांगले राहतात.

प्रवास करताना केसांची विशेष काळजी घ्या

प्रवास करताना किंवा उन्हात बाहेर जाताना शक्यतो केस झाकून ठेवा. आपले केस झाकून ठेवल्याने त्यांना कडक सूर्यप्रकाश आणि हानिकारक प्रदूषणापासून संरक्षण मिळते.

कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुवा

गरम पाणी तुमच्या केसांना कोरडे बनवते. दुसरीकडे, थंड पाण्याने स्वच्छ धुण्यामुळे, क्यूटिकल सील होण्यास आणि स्काल्प मजबूत होण्यास मदत होते, त्यामुळे तुमचे केस लांब वाढण्यास आणि त्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

Follow us on

Sharing Is Caring: