inspiration

बोलतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, महाभारता मध्ये सांगितले आहे या बद्दल

आपल्या बोलण्याची पध्दत आपल्या स्वभावा बद्दल सगळ काही सांगते. यामुळे कोणीही आपल्या स्वभावा बद्दल भरपूर गोष्टी जाणून घेऊ शकतो. महाभारता मध्ये शांती पर्व काळात भीष्म पितामह यांनी सांगितले कि वाणी म्हणजेच आपले बोलण्याच्या 4 विशेषता कोणत्या आहेत. ज्याच्या बोली मध्ये या 4 गुण असतात तो सगळ्यांचा प्रिय होतो. चला पाहूया कोणत्या आहेत त्या आपल्या वाणी मधील 4 गुण..

अव्याहृतं व्याहृताच्छ्रेय आहुः

सत्यं वदेद् व्याहृतं तद् द्वितीयम्।

वदेद् व्याहृतं तत् तृतीयं प्रियं,

धर्मं वदेद् व्याहृतं तच्चतुर्थम् ।।

अर्थात : व्यर्थ बोलण्या पेक्षा मौन राहिलेले चांगले, ही वाणीची पहिली विशेषता आहे. सत्य बोलणे ही दुसरी विशेषता आहे. प्रिय बोलणे ही तिसरी विशेषता आहे तर धर्मसंमत बोलणे वाणीची चवथी विशेषता आहे.

ज्या बोलण्याचा काहीही अर्थ नाही, असे बोलण्या पेक्षा गप्प बसलेले चांगले.

नेहमी खरे बोलणे ही दुसरी विशेषता आहे. यामुळे आपला मान-सन्मान वाढतो.

मधुर वाणी हा तिसरी विशेषता आहे. यामुळे आपण सगळ्यांचे प्रिय बनतो.

सत्य कथन, मधुर शब्दात आणि तेही धर्मास अनुसरून असेल तर त्याचे महत्व अधिक असते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button