astrologyPeoplerelationshipviral

या 7 लोकांना घरात थारा देऊ नये, अन्यथा तुम्ही सापडू शकता अडचणीत

काही लोकांच्या आगमनामुळे घरात चैतन्य निर्माण होत असले तरी काही व्यक्तींच्या प्रवेशामुळे अशांती देखील निर्माण होते. घरातील चैतन्य हरवून जाते. त्यामुळेच महाभारतातील विदूर नितीमध्ये अशा काही लोकांना घरातून लवकर बाहेर काढण्याचा सल्ला दिला गेला आहे. कोण आहेत या व्यक्ती, ज्यांच्यामुळे कुटूंबातील सौख्य हरवते. जाणून घेऊ या, कोण आहेत हे लोक.

श्लोक

अकर्मशीलं च महाशनं च लोक द्विष्टं बहुमायं नृशंसम्।
अदेशकालज्ञमनिष्टवेष मेतान् गृहे न प्रतिवासयेत।।

अकर्मण्य (आळशी)

काही लोक कर्मावर नाही तर भाग्यावर जास्त विश्वास ठेवतात. हे लोक सक्षम असूनही काम करत नाहीत आणि पूर्णपणे कुटुंबावर आश्रित राहतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठीसुद्धा कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहतात. कुटुंब नसल्यास हे नातेवाईकाकडे पोहोचतात. हे लोक कधीही स्वतःची जबाबदारी ओळखू शकत नाहीत, यामुळे अशा लोकांना घरात थांबू देऊ नये.

जास्त खाणारा

येथे जास्त खाण्याचा अर्थ गरजेपेक्षा जास्त खाणारा असा आहे. हे लोक गरजेपेक्षा जास्त जेवण करतात आणि यामुळे आळशी आणि लठ्ठ होतात. यामुळे हे कष्टाचे काम करू शकत नाहीत आणि आपल्या छोट्या -छोट्या गरजांसाठी कुटुंबावर अवलंबून राहतात. यांना घरातून काढण्याचा अर्थ, जबाबदारीची जाणीव व्हावी, ज्यामुळे हे स्वावलंबी होऊ शकतील.

इतरांशी शत्रुत्व घेणारा

काही लोंकाना छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याची सवय असते. अशा लोकांचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात. अशा लोकांसोबत राहणाऱ्या लोकांवरही संकटाचे सावट राहते. यामुळे इतरांशी शत्रुत्व घेणाऱ्या लोकांना घरातून लगेच काढून टाकावे.

अधिक मायावी (धूर्त)

असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतात आणि योग्य वेळेला कोणालाही धोका देऊ शकतात. अशा लोकांना घरात कधीही थारा देऊ नये, कारण या लोकांनी केलेल्या कामामुळे इतरांचे फक्त नुकसानच होते.

रागीट

ज्या लोकांना खूप जास्त राग येतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर मारण्याची भाषा करतात, अशा लोकांना चुकूनही घरात जास्तवेळ थांबू देऊ नये. हे लोक कितीही जवळचे असले तरी यांना घरात जागा देऊ नये.

देश आणि काळाचे भान न ठेवणारे

देश म्हणजे स्थान आणि काळ म्हणजे वेळ. जे लोक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, त्यांना कधीच घरात जागा देऊ नये. कारण जे लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःच्या मर्जीने काम करतात आणि यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

निंदित वेष धारण करणारा

जे लोक कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करतात किंवा मर्यादित कपडे घालत नाहीत अशा लोकांना घरात स्थान देऊ नये. कुटुंबामध्ये स्त्रियासुद्धा असतात आणि असे लोक स्वतःच्या आवडीचे कपडे परिधान करतात. यामुळे कुटुंबाच्या मर्यादेचे हनन होते. यामुळे अशा लोकांना घरात जास्त काळ थांबवू नये.


Show More

Related Articles

Back to top button