एका सापाला राजा कडून मागच्या जन्माचा बदला घ्यायचा होता, राजाला हे समजलं तर त्याने..

एक राजा होता. रात्री झोपे मध्ये त्याने एक स्वप्न पाहिले. स्वप्ना मध्ये एक साधू महाराज त्याला म्हणाले हे राजन, ‘उद्या रात्री तुला एक विषारी साप चावणार आहे, ज्यामुळे तुझा अंत होईल. हा साप तुझ्या महालाच्या मागील पिंपळाच्या झाडा जवळील बिलामध्ये राहतो. त्याला तुझ्या कडून मागील जन्माचा बदला घ्यायचा आहे.’

जेव्हा सकाळ झाली तेव्हा राजाने विचार केला कि जर स्वप्नातील गोष्ट खरी असेल तर मला माझ्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे. राजा ने विचार केला कि चांगल्या व्यवहारा पेक्षा मोठे शस्त्र या पृथ्वीवर कोणतेही नाही. त्याने सापाच्या सोबत देखील मधुर व्यवहाराने त्याच मन बदलण्याचा निश्चय केला.

संध्याकाळ होताच त्या वृक्षाच्या जवळ सापाचे बिळ असलेल्या ठिकाणा पासून ते आपल्या शयनगृहा पर्यंत फुल टाकले. सुगंधित जल शिंपडले. गोड दूध असलेली भांडी जागोजागी ठेवली आणि सेवकांना सांगितलं कि रात्री जेव्हा साप निघेल तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करू नका.

रात्री साप आपल्या बिळातून बाहेर निघाला आणि राजाच्या महाला कडे निघाला. तो जसा पुढे जात गेला, तसे त्याच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीला पाहून आनंदी झाला. त्याच्या मना मध्ये राजाच्या बद्दल प्रतिशोधाची भावना होती ती कमी झाली. द्वारपालाने देखील त्यास अडवलं नाही.

हे पाहून साप अजूनच प्रसन्न झाला. आपल्या शत्रू सोबत ज्याचा असा मधुर व्यवहार आहे, त्या राजाला चावूच कसे शकतो? हा विचार करून तो दुविधेत पडला. राजा जवळ जाऊन साप म्हणाला ‘हे राजन, मला तुला चावून मागच्या जन्माचा बदला घ्यायचा होता, पण तुझ्या चांगल्या व्यवहाराने मला परास्त केलं.’

आता मी तुझा शत्रू नाही तर मित्र आहे. मित्रत्वाचे प्रतीक म्हणून आपला बहुमूल्य मणी मी तुला देत आहे. घे हे तुझ्या जवळ ठेव. एवढे म्हणून आणि राजाला मणी देऊन साप निघून गेला.

लाइफ लेसन : जगा मध्ये काहीही अशक्य नाही आहे. आपल्या व्यवहाराने आपण कोणत्याही व्यक्तीला आपल्या बाजूने (पक्षात) करू शकतो. ज्या प्रमाणे लोखंडावर सतत प्रहार केल्याने त्याचा आकार बदलू शकतो. त्याच प्रमाणे आपल्या चांगल्या व्यवहाराने आपण कोणाचेही मन जिंकू शकतो.