Money

LIC कन्यादान पॉलिसी : मुलीच्या लग्नासाठी जमा करा 121 रुपये, एक साथ मिळतील लाखो रुपये

भारतामध्ये मुलीच्या जन्मानंतर घरातील लोक चिंतीत होतात त्यामुळे ते लोक मुलींचा जन्म होण्या बद्दल घाबरतात. याचे सगळ्यात मोठे कारण हुंडा आहे. होय हुंडा घेणे आणि देणे जरी कायदेशीर नसले तरी अजूनही अनेक समाजामध्ये ही अनिष्ठ प्रथा आहे. ज्यामुळे एक मिडल क्लास फैमिली चिंतीत होते. तर याच सोबत मुलीच्या शिक्षणासाठी आणि करियरसाठी देखील पैश्यांची गरज पडते पण आता चिंता करण्याची गरज नाही कारण मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी LIC खुशखबर घेऊन आली आहे. LIC मध्ये एक चांगली योजना आहे ज्यामध्ये आपण मुलीच्या लग्नासाठी 121 रुपये जमा करायची आहे आणि याचा चांगला रिटर्न मिळेल. LIC च्या या प्लानचे नाव कन्यादान आहे.

मुलीच्या लग्नासाठी 121 रुपये जमा करा

LIC कन्यादान पॉलिसी नावाच्या या योजने मध्ये 121 रुपये रोज या हिशोबाने जवळपास 3600 रुपये महिना प्लान मिळू शकतो. पण जर यापेक्षा कमी किंवा जास्त प्रीमियम देण्याची इच्छा असेल तर तुम्हाला तसा प्लान देखील मिळू शकतो. एलआईसी च्या या खास पॉलिसी नुसार, आपल्याला दररोज 121 रुपये जमा करावे लागतील आणि आपल्याला यानंतर 25 वर्षा नंतर 27 लाख रुपये मिळतील. याच सोबत जर पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला पॉलिसीचा प्रीमियम द्यायचा नाही आहे आणि त्यांना प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये मिळतील. तर 25 वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या नॉमिनी ला 27 लाख रुपये मिळतील. याचा लाभ तुम्हाला मुलीच्या जन्मा नंतर त्वरित मिळू शकतो. त्यामुळे मुलीच्या जन्माने आता चिंता करण्याची गरज नाही कारण LIC ने आपली ही चिंता समजून पॉलिसी आणली आहे आणि सांगितले आहे कि मुली चिंता करण्याचे कारण नसतात.

पॉलिसी बद्दल महत्वाचे मुद्दे

 

LIC कन्यादान पॉलिसी घेण्यासाठी वय एक वर्ष ते 30 वर्ष असले पाहिजे आणि हा प्लान 25 वर्षासाठी राहील पण प्रीमियम 22 वर्ष भरायचा आहे. आपल्या आणि मुलीच्या वयानुसार पॉलिसीची अवधी कमी होऊ शकते. अधिक माहितीसाठी आपल्या LIC एजंट सोबत संपर्क साधावा.

22 वर्ष प्रीमियम द्यावा लागेल

दररोज 121 रुपये किंवा महिन्याला 3600 रुपये प्रीमियम द्यावा लागेल.

पॉलिसी धारकाची मृयू झाल्यास प्रीमियम द्यावा नाही लागत.

मुलीला पॉलिसीच्या उरलेल्या वर्षात दरवर्षी 1 लाख रुपये मिळतील.

पॉलिसी पूर्ण झाल्यावर नॉमिनीला 27 लाख रुपये मिळतील.

ही पॉलिसी कमी किंवा जास्त प्रीमियमची देखील मिळू शकते.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील LIC ऑफिसमध्ये किंवा LIC एजंट सोबत संपर्क करावा.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close