food

या पानांचा फक्त वास घेतल्याने डोकेदुखी मुळासह दूर होते, पिण्यामुळे मरतील पोटातील किडे

आपल्या घरामध्ये काही अश्या वस्तू असतात त्या बहुगुणी असतात परंतु आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला लिंबाच्या पानांचे असे 3 फायदे सांगत आहोत ज्याचा फक्त वास घेतल्याने डोकेदुखी मुळासहदूर होते, पिण्यामुळे पोटातील किडे मरतात आणि पिचकारी मारल्याने नाकामधून वाहणारे रक्त बंद होते. चला पाहू याबद्दल अधिक माहिती.

मायग्रेन किंवा डोकेदुखी मध्ये फायदेशीर

लिंबाच्या पानांचा रस काढून त्याचा वास घेतल्याने (हुंगाल्याने) ज्या व्यक्तीला नेहमी डोकेदुखी असते त्यास देखील आराम मिळतो. हा उपाय सतत काही दिवस केल्याने आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. या उपायाने डोकेदुखी आणि माइग्रेन समस्येत लोकांना आराम मिळाल्याचे पाहण्यात आलेले आहे.

गाईचे ताजे तूप सकाळ-संध्याकाळ 2-4 थेंब नाकामध्ये कापसाच्या मदतीने टाकल्याने किंवा वास घेतल्याने अर्धे डोके दुखत असल्यास आराम मिळतो. सोबतच नाकातून रक्त वाहत असल्यास बंद होते. हा उपाय 7 दिवस करावा.

डोक्याच्या ज्याबाजुच्या भागात वेदना होत असतील त्याबाजूच्या नाकपुडी मध्ये 7-8 थेंब राईचे तेल टाकल्याने किंवा वास घेतल्याने वेदना बंद होतात. 4-5 दिवस दिवसातून 2-3 वेळा याप्रकारे वास घेतल्याने सतत होणाऱ्या डोकेदुखी बंद होते.

पोटातील कृमी (किडे)

10 ग्राम लिंबाच्या पानांचा रस आणि 10 ग्राम मध मिक्स करून पिण्यामुळे 10-15 दिवसात पोटातील किडे मरून नष्ट होतात.

नाकातून रक्त येणे

ताज्या लिंबाचा रस काढून नाकामध्ये पिचकारी देण्यामुळे नाकातून रक्त वाहणे बंद होईल.


Show More

Related Articles

Back to top button