Connect with us

2-3 दिवसा मध्ये पोट मखमली सारखे हलके वाटेल जर पोट स्वच्छ करण्याचा हा घरगुती उपाय केला

पोट साफ होण्यासाठी उपाय

Health

2-3 दिवसा मध्ये पोट मखमली सारखे हलके वाटेल जर पोट स्वच्छ करण्याचा हा घरगुती उपाय केला

व्यस्त जीवनशैली मध्ये आणि चुकीच्या वाईट खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला पोटाशी संबंधीत त्रास होण्यास सुरुवात होते. जसे पोटामध्ये गैस तयार होणे, एसिडीटी, पोटदुखी,जळजळ होणे. यासर्वांच्या व्यतिरिक्त अजून एक त्रास आहे ज्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत ती म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा ज्याला बद्धकोष्ठ बोलले जाते. सकाळी पोट स्वच्छ होणे हे आपण निरोगी असल्याचे लक्षण आहे पण वेळेच्या अनुसार माणसाची प्रत्येक गोष्ट बदलत चालली आहे. मंग ते झोपण्याची आणि सकाळी उठण्याचे टाईमटेबल असो किंवा जेवणाची वेळ असो सर्व काही अवेळी झाले आहे. वेळेचा अभाव किंवा जास्त व्यस्त असणे असे अनेक कारणे याबाबतीत दिली जाऊ शकतात पण हिच कारणे आहेत ज्यामुळे आपण स्वताच्या खाण्यापिण्याकडे आणि आरामाकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून मंग अपचन, गैस, बद्धकोष्ठ हे आजार मागे लागतात.

जर आपले पोट व्यवस्थित साफ झाले नाही तर ते आपल्यासाठी अत्यंत हानिकारक होऊ शकते. यामुळे जळजळ, आंबट डकार इत्यादी समस्या होऊ शकतात. खरेतर आज आपण येथे पोट साफ करण्यासाठीचे घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्याच्या वापरामुळे तुम्ही अपचन सारख्या समस्येला दूर करू शकता.

पोट साफ करण्यासाठी  उपाय :

इसबगोल : इसबगोल 6 ग्राम 250 मिलीलीटर कोमट दुधा सोबत झोपण्या अगोदर प्यावे. कधी-कधी इसबगोल पावडर घेतल्यामुळे पोट फुगते. असे मोठ्या आतड्यात इसबगोल वर बैक्तीरियाच्या प्रभावाने तयार होणाऱ्या गैसमुळे होते. यासाठी लक्षात ठेवा इसबगोलचे प्रमाण कमीतकमी ठेवा. इसबगोलच्या सेवनामुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे मल व्यवस्थित बाहेर निघून जाते आणि बद्धकोष्ठ दूर होते. इसबगोल घेतल्यानंतर दोन-तीन वेळा पाणी प्यावे. यामुळे इसबगोल चांगले फुलते.

त्रिफला : त्रिफला चूर्ण दोन चमचे रात्री झोपताना गरम दुध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे बद्धकोष्ठ दूर होते.

पाणी : दररोज कमीतकमी 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. पाणी सतत पिण्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ नैसर्गिकरीत्या शरीरा बाहेर जाण्यास मदत होते.

लिंबू रस : लिंबू मध्ये एंटीऑक्सीडेंट गुण असतात आणि यामध्ये असलेले उच्च विटामिन सी तुमचे पाचनतंत्र चांगले ठेवते. यासाठी पोटाच्या स्वच्छतेसाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. एक ग्लास पाण्यामध्ये मध, लिंबूरस आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून प्यावे.

पोटाची सफाई, पोटामध्ये गैस होणे, एसिडीटी, पोटदुखी आणि जळजळ यावर रामबाण उपाय

मध : रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा मध कोमट पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होते.

एरंडी तेल : पोट साफ करण्यासाठी एरंडी तेल रामबाण आहे. रात्री झोपण्या अगोदर थोडेसे एरंडी तेल एक ग्लास कोमट दुधामध्ये मिक्स करून पिण्यामुळे सकाळी पोट स्वच्छ होते.

लिंबू रस, मध आणि काळे मीठ : सकाळी रिकाम्या पोटी लिंबू रस, एक चमचा मध आणि थोडेसे काळे मीठ 1 ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे पण पोट साफ होते.

नारळ पाणी : नारळ पाणी देखील पोट साफ करण्यासाठी रामबाण उपाय आहे. रोज नारळपाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे पोट स्वच्छ होते.

आवळा पावडर : आवळा पावडर सेवन केल्यामुळे अपचनची समस्या दूर केली जाऊ शकते. रोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा आवळा पावडर सेवन केल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.

बडीशेप : बडीशेप खाण्यामुळे गैस आणि पोटातील जळजळ सारख्या समस्ये मध्ये आराम मिळतो. यासाठी जेव्हाही जेवण कराल जेवणा नंतर बडीशेप जरूर खावी.

इलायची : कधीकधी असे होते की इच्छा नसताना किंवा नकळतपणे आपण जास्त जेवण करतो. अश्यावेळी लहान इलायची चावून खाण्यामुळे पचन क्षमता वाढते आणि तुम्हाला थोड्यावेळातच हलकेहलके वाटते.

कृपया लक्ष द्या : इलायची सेवन जास्त केल्यामुळे गर्भवती महिलांचा गर्भपात होऊ शकतो यासाठी गर्भवती महिलांनी जास्त इलायची सेवन करू नये

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top