लक्ष्मी आपल्यावर लवकर होईल कृपावंत फक्त दिवाळीच्या दिवशी यापैकी कोणताही एक उपाय करा, शीघ्र लाभ मिळेल

दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विशेषतः माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा केली जाते. यादिवशी सगळे लोक गणेश-लक्ष्मी यांची पूजा करून त्यांना प्रसन्न करू इच्छितात. प्रत्येकाला वाटते कि त्यांच्यावर धनाची देवी माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न व्हावी. त्यामुळे सगळे विधी विधान पूर्वक दिवाळीला पूजा करण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक लोक असेही आहेत जे विविध उपाय देखील करून पाहतात, असे सांगितले जाते कि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या जीवनात कधीही धानाच्या संबंधित समस्या होत नाही.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करण्याची प्रथा अत्यंत जुनी आहे. जर आपल्याला वाटते कि धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर लवकर कृपावंत व्हावी तर यासाठी दिवाळीच्या दिवशी काही सोप्पे उपाय त्यासाठी करता येतील. आज आम्ही आपल्याला काही असेच उपायांची माहिती देणार आहोत. ज्यापैकी आपण कोणताही एक उपाय केला तरी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.

जर आपल्याला वाटते कि आपल्या जीवनात धनाची कमी न व्हावी तर आपण दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या पानांना तोडावे पण आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि आपण जी पिंपळाची पाने तोडणार आहोत ती कुठेही फाटलेली किंवा तुटलेले नसावे. आपण या पानाला घरी घेऊन यावे आणि या पानावर ‘ओम महालक्ष्म्यै नमः’ हा मंत्र लिहून पूजा स्थानी ठेवा. शनिवारच्या दिवशी हे पण आपण पिंपळाच्या मुळाजवळ ठेवा आणि दुसरे पण आणून पूजा स्थानी ठेवावे हे कार्य आपल्याला प्रत्येक शनिवारी करायचे आहे. हा उपाय केल्याने धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात.

जर आपण देवी लक्ष्मी ची कृपा प्राप्त करू इच्छिता तर यासाठी दिवाळीच्या रात्री लवंग आणि इलायची घ्यावी आणि या दोघांना जाळून एक मिश्रण तयार करावे. आता या मिश्रणाने देवी-देवतांना टिळा (तिलक) लावा, हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर राहील.

जर आपल्याला आपली निर्धनता दूर करायची असेल तर दिवाळीच्या दिवशी आपण एखाद्या किन्नर ला मिठाई आणि पैसे द्यावेत आणि त्या बदल्यात त्याच्या कडून 1 रुपयांचा सिक्का मागावा आणि त्यास तिजोरी मध्ये  ठेवावा. हा उपाय केल्याने आपली गरिबी लवकरच दूर होईल, हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो.

जसे कि आपल्या सगळ्यांना माहीत आहे यावर्षीची 2019 दिवाळी रविवारी आहे, जर आपण या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर यामुळे आपल्या जीवनात शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात.

जर आपण आपल्या धना मध्ये वाढ करू इच्छिता तर दिवाळीच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पानावर हळदीने स्वास्तिक चे चिन्ह बनवून त्यास आपल्या तिजोरी मध्ये ठेवावे, त्या व्यतिरिक्त दिवाळीच्या रात्री आपल्या घरामध्ये श्री यंत्र स्थापन करणे देखील शुभ मानले जाते.

धन वृद्धी करण्यासाठी सगळ्यात सफल उपाय दिवाळीच्या रात्री कणकधारा स्तोत्र वाचन करणे हा आहे.