astrology

पहा कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणता लाफिंग बुद्धा ठेवावा

फेंगशुई मध्ये लाफिंग बुद्धाला महत्वाचे स्थान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाफिंग बुद्धा वेगवेगळे फायदे देणारे असतात. त्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते लाफिंग बुध्दा मध्ये. कोणत्या उद्देश पूर्तीसाठी कोणता घर-दुकानात कोणता लाफिंग बुद्धा ठेवला पाहिजे, यागोष्टीला जास्त महत्व असते. मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे लाफिंग बुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्या प्रकारचा लाफिंग बुद्धा तुमच्यासाठी योग्य आहे जो तुमची इच्छा पूर्ण करू शकतो हे आज आपण पाहू.

झोपलेला लाफिंग बुद्धा

झोपलेल्या लाफिंग बुध्दाची मूर्ती दुर्भाग्य आणि दरिद्रता दूर करणारी मानली जाते. जर तुम्हाला कामामध्ये असफलता आणि दुर्भाग्य यांचा सामना करावा लागत असेल तर घर-दुकानात झोपलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवणे चांगले. यामुळे हळूहळू दुर्भाय समाप्त होईल.

धनाचे गाठोडे घेतलेला लाफिंग बुद्धा

धनाचे गाठोडे आपल्या खांद्यावर टांगलेला लाफिंग बुद्धा कोणत्याही घर-ऑफिससाठी शुभ मानले जाते. ही मूर्ती ठेवल्यामुळे पैश्यांशी निगडीत समस्या दूर होण्यास सुरुवात होते आणि कधीही पैश्यांची तंगी राहत नाही.

दोन्ही हात वर केलेला लाफिंग बुद्धा

जर बिजनेस व्यवस्थित चालत नसेल तर किंवा सतत नुकसान होत असेल तर दोन्ही हात वर केलेला लाफिंग बुद्धा दुकान किंवा ऑफिस मध्ये ठेवल्यामुळे फायदा होतो.

मुलांच्या सोबत बसलेला लाफिंग बुद्धा

ज्यामुर्ती मध्ये लाफिंग बुद्धा मुलांच्या सोबत बसलेला आहे ती मूर्ती संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असणाऱ्यासाठी शुभ मानली गेली आहे. ही मूर्ती पती-पत्नी आपल्या रूम मध्ये ठेवू शकतात.

पिशवी घेतलेला लाफिंग बुद्धा

पिशवी घेतलेला लाफिंग बुद्धा दुकान किंवा ऑफिसच्या मेन गेट वर ठेवले पाहिजे, यामुळे इनकम वाढते. लक्षात ठेवा पिशवी मध्ये ठेवलेले सामान बाहेर पर्यत दिसले पाहिजे.

ड्रेगनवर बसलेला लाफिंग बुद्धा

जर तुमच्या घरावर कोणी जादू-टोना करत असेल किंवा कोणाची वाईट नजर घरातील लोकांना लागत असेल तर ड्रेगनवर बसलेल्या लाफिंग बुध्दाची मूर्ती घरामध्ये ठेवा. सर्व निगेटिव्ह इफेक्ट यामुळे समाप्त होते.

धातूचा लाफिंग बुद्धा

असे व्यक्ती जे कधी निर्णय घेऊ नाही शकत, ज्यांची निर्णय क्षमता कमजोर आहे त्यांनी धातू पासून बनलेला लाफिंग बुद्धा घरात ठेवल्यामुळे निर्णय क्षमता वाढते.

ध्यान करणारा लाफिंग बुद्धा

ज्यामुर्ती मध्ये लाफिंग बुद्धा ध्यान करत आहे अशी मूर्ती ठेवल्यामुळे घर-दुकान यांचे वातावरण शांतीपूर्ण राहते आणि तेथील लोकांचा क्रोध कमी होतो.

नावेवर (होडी वर) बसलेला लाफिंग बुद्धा

नावे वर बसलेल्या लाफिंग बुद्धाला ऑफिस किंवा घरात वर्किग टेबल वर ठेवने शुभ असते. यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. लक्षात ठेवा नाव अश्या पद्धतीने ठेवा की ती आत मध्ये येताना दिसली पाहिजे.

वु लू घेतलेला लाफिंग बुद्धा

जर घरामध्ये कोणी आजारी आहे आणि आजार कोणता आहे हे समजत नसेल तर हातामध्ये वु लू घेतलेला लाफिंग बुद्धा आजारी व्यक्तीच्या जवळ ठेवा. लवकरच चिकित्सेत आजार कोणता आहे हे समजेल. वु लू पिवळ्या रंगाचे चीनी फळ आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 6 उपाय घराला गरिबी पासून वाचवू शकतात


Show More

Related Articles

Back to top button