Saving Scheme :भविष्यात तुमच्या पत्नीच्या मजबूत आर्थिक परिस्थितीसाठी आजच तिच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करा. यासाठी तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये सहभागी व्हावे लागेल आणि त्यात गुंतवणूक करून तुम्ही मोठा नफा कमवू शकता.

या पेन्शन योजनेद्वारे, तुमच्या पत्नीचे वय 60 वर्षे पूर्ण होताच, तिला ठराविक रक्कम मिळणे सुरू होईल. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) खात्याद्वारे तुमच्या पत्नीला किती पेन्शन मिळेल हे देखील तुम्ही ठरवू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या जोडीदाराला वृद्धापकाळात पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

NPS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वार्षिक किंवा मासिक काही पैसे गुंतवू शकता. हे पेन्शन खाते वयाच्या 60 वर्षापर्यंत मॅच्युअर होते, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते 65 वर्षांपर्यंत वाढवू शकता.

जर तुमची पत्नी सध्या 30 वर्षांची असेल आणि तुम्ही आतापासून प्रत्येक महिन्याला 5000 रुपये गुंतवत असाल. आणि जर त्यांना वार्षिक 10% परतावा मिळाला तर वयाच्या 60 व्या वर्षी त्यांच्या खात्यात सुमारे 1 कोटी रुपये जमा होतील. यातून त्यांना पूर्ण ४५ लाख रुपये मिळतील आणि उर्वरित पैशांमधून त्यांना दरमहा 45 हजार पेन्शन मिळत राहील.