Satish Shah: या एक्टर वर लंडन मध्ये वर्णद्वेषी कमेंट करणाऱ्यांना पहा काय दिले जबराट उत्तर

Satish Shah London Airport Incident: बॉलिवूड एक्टर सतीश शाह (Satish Shah) यांना लंडन एयरपोर्टवर रेसिस्ट कमेंट ऐकण्यास मिळाली. एयरपोर्ट स्टाफ ने सतीश शाह वर कमेंट केली होती, त्यानंतर सतीश शाह यांनी चोख उत्तर दिले.

सतीश शाह (Satish Shah London Incident) यांच्या सोबत लंडनच्या हीथ्रो एयरपोर्टवर घडलेल्या प्रकारा नांतर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, लंडन एयरपोर्ट स्टाफ मला फर्स्ट क्लासमध्ये पाहून आश्चर्यचकित झाला आणि नंतर त्यांनी आपल्या सहकर्मचाऱ्याला विचारले, ‘या लोकांनाही फर्स्ट क्लास परवडेल का?’

सतीश शाह यांनी सोशल मीडियावर सांगितले की, एयरपोर्टवर ही कमेंट ऐकल्यानंतर त्यांनी ‘कारण आम्ही भारतीय आहोत’ असे उत्तर दिले. सतीश शाह (Satish Shah Tv Shows) त्यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर एयरपोर्ट स्टाफची बोलती बंद झाली.

सतीश शाह ट्विटरवर वर्णद्वेषी कमेंट ऐकावे लागल्याचे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोक अभिनेते सतीशचे कौतुक करत आहेत. काही लोक म्हणतात की वंशवाद परदेशी लोकांच्या मनात अजूनही आहे पण ते जगापासून लपवून ठेवतात.

एक्टर सतीश शाह यांनी त्यांच्या करियर मध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई या टीव्ही शोमुळे सतीश शाह हे प्रसिद्धी झोतात आले होते. सतीशने मैं हूं ना, ओम शांती ओम आणि रा वन यांसारख्या चित्रपटांमध्ये आपला अभिनय केला आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: