Nashik Fire: नाशिक येथील जिंदाल कंपनीत मोठा स्फोट; जीवित हानीची भीती, बचावकार्य सुरू

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली असून आकाशात काळ्या धुराचे मोठे लोट पसरले आहेत. बचावकार्य चालू करण्यात आले आहे.

या स्फोटामध्ये अनेक कामगारांच्या जिवीतहानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला ही आग लागली आहे. आगीत काही कामगार जखमी झाल्याची बातमी आहे.

आगीचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेले नाही. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. या कंपनीत एक हजारा पेक्षा अधिक कामगार आहेत. साडे अकराच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

इगतपुरी नाशिक चे पालकमंत्री दादा भुसे हे कृषी महोत्सव कार्यक्रमासाठी सिल्लोड येथे जात असताना जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीची घटना त्यांना समजली. त्यामुळे तातडीने कन्नड येथून मुंडेगावाकडे येण्यासाठी पालकमंत्री रवाना झालेले आहेत.

जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जात असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांच्या पथकाने उपचाराची तयारी केली असून जखमींवर उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आलेले आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: