Government Scheme : सरकारची धडाकेबाज योजना…! आता दरमहा खात्यात येणार २१ हजार रुपये; सविस्तर योजना समजून घ्या

Government Scheme: आपण जर पैशाची (Money) गुंतवणूक (investment) करण्याचे ठरवले आहे तर आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना प्रतिमहा 21,000 रुपये मिळतील.

याचा अर्थ तुम्हाला नोकरी (Job) आणि व्यवसाय न करता दर महिन्याला 21,000 रुपये मिळतील. या सरकारी योजनेला नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension System) असे नाव आहे.

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) योजना काय आहे?

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही आपल्या माहितीसाठी सांगतो कि ही एक सरकारी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये इक्विटी (equity) आणि डेट (debt) दोन्हीचा समावेश आहे. एनपीएसला सरकारकडून हमीचे कवच मिळते. निवृत्तीनंतर अधिक मासिक पेन्शन मिळविण्यासाठी तुम्ही NPS योजनेत गुंतवणूक करून सहभागी होऊ शकता.

NPS मध्ये वयाच्या 20 व्या वर्षापासून गुंतवणूक करावी लागेल

जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी NPS मध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली आणि दरमहा 1000 रुपये जमा केले, तर निवृत्तीच्या वयापर्यंत तुमचे म्हणजेच गुंतवणूकदाराचे एकूण योगदान 5.4 लाख होईल. यासोबतच तुम्हाला यामध्ये 10 टक्के वार्षिक परतावा मिळेल, यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट 1.05 कोटी होईल.
21140 पेन्शन प्रतिमहा मिळणार आहे

आता जर NPS ग्राहकाने 40 टक्के कॉर्पसचे वार्षिकीमध्ये रूपांतर केले तर त्याचे मूल्य ₹42.28 लाख होईल. त्याच वेळी, मासिक पेन्शन 10 टक्के वार्षिक दराने ₹21,140 रुपये असू शकते. एवढेच नाही तर NPS ग्राहकांना सुमारे ₹63.41 लाख रुपयांची एकरकमी रक्कम देखील मिळेल.

Income tax benefit

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सुकन्या समृद्धी योजना इत्यादींसारखेच NPS पेन्शन योजना ही पण एक सरकारी योजना आहे. यामध्ये योजने कोणताही गुंतवणूकदार मॅच्युरिटी रकमेचा योग्य वापर करून मासिक पेन्शनची रक्कम वाढवू शकतो.

NPS च्या मदतीने तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ₹50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सूट मिळेल.

गुंतवणुकीचे तीन प्रकार आहेत

NPS मध्ये गुंतवणुकीचे आपल्याला तीन पर्याय उपलब्ध आहेत, यामध्ये गुंतवणूकदाराला आपले पैसे कुठे गुंतवले जातील हे निवडायचे आहे. इक्विटी, कॉर्पोरेट कर्ज आणि सरकारी रोखे. इक्विटीच्या अधिक एक्सपोजरसह, ते सर्वोत्तम परतावा देखील देते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलल्यानंतरच तुम्ही कोणतीही गुंतवणूक करावी हे लक्षात ठेवा.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: