Gold Price Today: सोन्याचा भाव 7 महिन्यांच्या नीचांकावर, 2 दिवसांत चांदी 1700 रुपयांनी घसरली

Gold Price Today: 24 सप्टेंबर रोजी भारतात सोन्याच्या किमती (Gold Price) 500 रुपयांनी आणखी घसरून 22 कॅरेटसाठी 46,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावल्या, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 530 रुपयांनी घसरून 50,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

भारतात सणांचा हंगाम (Festive Season) जवळ येत आहे आणि या हंगामात सोन्याची मागणी (Demand for gold) वाढते. सणासुदीच्या काळात सोन्याची चमक कायम राहते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Gold Price Crashes To 7 Month Low

सोन्याच्या किमती आता जवळपास 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,250 रुपये नोंदवली गेली होती आणि आता 22 कॅरेटसाठी पिवळ्या धातूची किंमत 46000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

२४ फेब्रुवारीला २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१,५५० रुपये प्रति १० ग्रॅम होता आणि आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम रुपये ५०,२०० इतका नोंदवला गेला आहे.

Silver Falls By Rs 1700 In 2 Days

चांदीचा (Silver) विचार केला तर अवघ्या 2 दिवसांच्या कालावधीत 1700 रुपयांची घसरण झाली आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी चांदीची किंमत प्रति किलो 1200 रुपयांनी घसरून 56,800 रुपयांवर आली, तर चांदीची किंमत आज 500 रुपयांनी घसरून भारतात 56,300 रुपये प्रति किलोवर बंद झाली.