Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) सतत घसरण सुरू आहे. ब्रेंट क्रूड तेल (Brent crude oil) आता प्रति बॅरल $91 च्या जवळपास आहे. मात्र तरीही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) किमती मध्ये कोणताही फरक पडलेला नाही.

आजही भारता मध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (diesel) चे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने (Central Govt) शेवटच्या वेळी 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात केली होती. त्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेल एवढे स्वस्त होणार आहे

कच्च्या तेलाच्या किमती मधील घसरणीनंतर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याचे मानले जात आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 ते 3 रुपयांनी कमी होण्याची शक्यता याक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

परंतु असे असले तरी याचवेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले आहेत की, तोट्याचा सामना करण्यासाठी तेल कंपन्या आता पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करणार नाहीत.

पेट्रोल आणि डिझेल तुमच्या शहराची किंमत काय आहे?

  • दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
  • लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
  • जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
  • तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
  • पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
  • गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
  • बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
  • भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
  • चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
  • हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर