जेव्हा माता लक्ष्मी ने इंद्र देवाला सांगितले ‘लक्ष्मी कोणत्या लोकांच्या घरात निवास करत नाही’, अत्यंत मनोरंजक प्रसंग

यावर्षी 27 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. प्राचीन काळी या तिथीच्या दिवशी समुद्र मंथन झाले होते ज्यामधून माता लक्ष्मी अवतरित झाल्या होत्या. असे सांगितले जाते कि ज्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करते तेथे कधी अन्न धान्य आणि धन यांची कमी होत नाही. त्यामुळे आज या पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊ कि कोणत्या लोकांच्या घरात माता लक्ष्मी निवास करणे पसंत करत नाही. या गोष्टीचा उल्लेख माता लक्ष्मीने देवराज इंद्र यांना संक्षिप्त महाभारत मधील शांती पर्व मधील  प्रसंगात केला आहे. त्यांनी यामध्ये सांगितलं आहे कि लक्ष्मीला कसे घर चांगले आणि वाईट वाटते.

या प्रसंगाच्या अनुसार पहिले माता लक्ष्मी असुरांच्या येथे राहत होती पण मंग देवराज इंद्र यांच्या कडे निवास करण्यासाठी स्वर्गात जाते. माता लक्ष्मीला पाहून इंद्र आश्चर्य व्यक्त करतात आणि विचारतात कि तुम्ही असुरांच्याकडे मोठ्या आदराने राहत होत्या. मी तुम्हाला अगोदर अनेक वेळा विनंती केली कि आपण स्वर्गात यावे. पण आपण आल्या नाहीत आणि आता न बोलावता आल्या आहेत. कृपया याचे कारण सांगावे.

तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या हे इंद्र काही काळा पूर्वी पर्यंत असुर धर्मात्मा होते पण आता ते बदलले आहेत. अधार्मिक झाले आहेत. त्यामुळे मी तेथे निवास नाही करू शकत. जेथे प्रेमाच्या ऐवजी द्वेष, राग, भांडण, अधार्मिकता, दुर्गुण, वाईट सवयी जसे मद्य, तंबाखू आणि मांसाहार होतो तेथे माझे राहणे योग्य नाही आहे. हेच कारण आहे कि मी दूषित वातावरणाचा त्याग करून सद्गुण असलेल्या स्थानी म्हणजेच स्वर्गात आली. माता लक्ष्मीच्या या बोलण्या नंतर इंद्र देवांनी त्यांना पुढे विचारले कि ते कोणकोणते स्थान आहेत जेथे आपण निवास करणे पसंत करत नाहीत. त्यावर उत्तर देताना माता लक्ष्मी म्हणाल्या..

जे लोक माता पिता, गुरु आणि मोठ्यांचा आदर नाही करत तेथे मी नाही राहत. जे लोक आपलीच आई वडिलांच्या सोबत भांडण आणि वाद घालतात त्यांचा अपमान करतात अश्या लोकांच्या घरात मी निवास नाही करत.

ज्या महिला परपुरुषाला वाईट नजरेने पाहते, त्यांच्या सोबत सहवास करते, पती आणि सासूचा आदर नाही करत मी त्यांच्यावर देखील कृपा करत नाही.

ज्या ठिकाणी पाप होते, अधर्माला पाठीशी घातले जाते आणि स्वार्थाला अधिक महत्व दिले जाते अश्या लोकांच्या घरात मी निवास नाही करत. तर मी तेथे निवास करते जेथे लोक पवित्र मनाचे आहेत आणि धार्मिक आचरण करतात. जे सगळ्यांचा आदर सन्मान करतात आणि कोणालाही दगा देत नाहीत. दुसऱ्याची मदत करतात, इमानदारी, दानधर्म इत्यादी चांगल्या गुणांच्या लोकांवर माझी कृपा असते.

जेथे विद्वान लोकांचा सन्मान होत नाही आणि मुर्खांना मान दिला जातो तेथे मी निवास करणे टाळते.

जेथे घरामध्ये अन्न वाया घालवत नाहीत. अन्न देवी देवतांच्या प्रमाणे पवित्र मानले जाते तेथे मी आपोआप निवास करते.

माता लक्ष्मीला शांतता आवडते त्यामुळे माता लक्ष्मी भांडण तंटा आणि गोंगाट असलेल्या कुटुंबात देखील निवास करणे पसंत नाही करत.

त्यामुळे जर आपल्याला वाटते कि आपल्या घरात देखील माता लक्ष्मी ने निवास करावा तर आपण या गोष्टींची काळजी घ्यावी.