9 वर्षा पासून चित्रपटा पासून दूर आहे ही अभिनेत्री, आता कार सोडून रिक्षा मध्ये प्रवास करताना दिसली

आपल्या पैकी अनेकांनी शाहरुख खान मुख्य भूमिके मध्ये असलेला ‘मोहब्बते’ हा चित्रपट पाहिलाच असेल या मध्ये अनेक नवीन कलाकारांना संधी देण्यात आली होती. तसेच तुम्हाला मोहबत्ते फिल्म ने ओळख मिळवून दिलेली किम शर्मा ही अभिनेत्री देखील आठवत असेल. ‘मोहब्बते’ फेम अभिनेत्री किम शर्मा दीर्घकाळा पासून चित्रपटा मधून दिसून येत नाही आहे. पण अनेक इव्हेंट्स मध्ये ती नजरेस पडते. किम शर्मा ने आपल्या फिल्म करिअर मध्ये जवळपास 18 फिल्म्स केल्या आहेत ज्यामध्ये ‘मोहबत्ते’ मधील भूमिका सगळ्यांच्या लक्षात आहे.

यशराज फिल्म्स च्या प्रोडक्शन मधून डेब्यू करणारी किम शर्माचा शेवटचा हिंदी चित्रपट 2008 मध्ये ‘मनी है तो हनी है’ हा प्रदर्शित झाला होता. त्याच सोबत ती 2010 मध्ये तेलुगू फिल्म ‘यगम’ मध्ये दिसून आली होती. प्रसिद्धी पासून दूर असलेली किम शर्माला हल्लीच पाहिले गेले जेथे ती आपली लग्जरी गाडी मध्ये नाही तर एका ऑटो रिक्षा मधून प्रवास करताना दिसली.

रिक्षात बसलेली किम कैमेरा पाहून हसली. या दरम्यान ती फोन वर बीजी असल्याचे दिसून आले. किम शर्मा ने व्हाइट कलरचा ड्रेस परिधान केला होता. सोबतच व्हाइट हिल्स घातल्या होत्या. तसेच केस बांधलेले होते.

किम शर्मा आपल्या वैयक्तिक आयुष्या बद्दल चर्चेत असते. किम शर्मा प्राणी प्रेमी आहे. ती आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फिरताना देखील या आधी पाहण्यात आले होते.

किम शर्मा ने 2010  बिजनेसमैन अली पंजानी सोबत लग्न केलं होत. तिचे वैवाहिक जीवन जास्त काळ चालले नाही आणि 2016 साली ते वेगळे झाले. याच सोबत 39 वर्षाच्या किम ने हर्षवर्धन राणे ला देखील डेट केले आहे. काही काळापूर्वीच दोघांचा ब्रेकअप झाला आहे. किम शर्माचे नाव अनेक वर्ष क्रिकेटर युवराज सिंग याच्या सोबत देखील जोडलं गेलं होत.