dharmik

फक्त खिशामध्ये ठेवावी ही वस्तू, महालक्ष्मी होईल प्रसन्न आणि देईल अगणित पैसा

पैश्यांचे आकर्षण प्रत्येक व्यक्तीला असते प्रत्येकाला वाटते कि त्याने लवकरात लवकर भरपूर पैसे कमवावेत. प्रत्येकाला आपल्या खिशामध्ये भरपूर पैसे असावेत आणि ते कधीही रिकामे होऊ नये असे वाटते. पण असे होणे कठीण असते. प्रत्येका जवळ नेहमीच पैसे राहतील हे शक्य होऊ शकत नाही. जगामध्ये प्रत्येकाला धनाच्या संबंधित समस्यांचा सामना कमी अधिक प्रमाणात करावा लागतो. अत्यंत कमी लोकांना आपल्या जीवनामध्ये पैश्यांच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही.

तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमते प्रमाणे पैसे कमावण्यासाठी भरपूर मेहनत घेत असतात. त्यापैकी काही लोकांना नशिबाची साथ मिळते आणि पैसे कमावण्यात ते यशस्वी होतात परंतु बहुतेक लोक पैसे कमावण्यात असफल राहतात. जर आपण ज्योतिष अनुसार पाहिले तर काही विशेष योग असतात ज्यामुळे व्यक्तीला आपल्या जीवना मध्ये पैश्यांची कमी कधी होत नाही आणि यामुळे व्यक्ती श्रीमंत देखील बनतो.

ज्योतिष अनुसार असे सांगितले जाते कि एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये एखादा ग्रह अशुभ प्रभाव देत असेल तर त्याच्या उत्पन्नावर प्रभाव पडतो आणि व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत होतो. तर कुंडली मधील अशुभ ग्रहाच्या प्रभावास ठीक करण्यासाठी उपाय देखील सांगितलेले आहेत. जर या उपायांना केले तर यामुळे जीवनात धनाच्या संबंधित समस्या लवकरच दूर होऊ शकतात आणि जीवनातील पैश्याची कमी दूर होऊ शकते. हे उपाय व्यक्तीला लवकरात लवकर धनवान देखील बनवू शकतात. याच सोबत धनाची देवी माता लक्ष्मीची सेवा करणे श्रेष्ठफलदायक मानले गेले आहे.

माता लक्ष्मीची आराधना करून धन लाभ प्राप्त होण्याची इच्छा सांगावी. यामुळे लवकर श्रीमंत होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होऊ शकेल. जर नियमित पणे धनाची देवी माता लक्ष्मीची विधी पूर्वक पूजा अर्चना केली तर यामुळे चांगला लाभ मिळतो. याच सोबत अजून एक उपाय आहे ज्यास केल्याने लवकरात लवकर श्रीमंत होणे शक्य आहे. हा उपाय कोणता आहे हे आपण पुढे पाहू.

जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत बनण्याची इच्छा असेल तर त्याने शुभ मुहूर्तावर बाजारातून दोन पिवळ्या कवडया घेऊन यावे. पिवळी कवडी तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकाना मध्ये मिळू शकते. पिवळया रंगाच्या कवडया घेऊन एखाद्या विशेष दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून नित्यकर्म आटोपल्या नंतर धनाची देवी माता लक्ष्मीची पूजेची तयारी करावी. यानंतर पूजे मध्ये धनाची देवी माता लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी त्यासोबत दोन पिवळ्या कवडया ठेवाव्यात. यानंतर विधी विधानाने देवी लक्ष्मीची पूजा करावी यानंतर दोन पिवळ्या कवड्यांना वेगवेगळ्या लाल कपडयात बाधावे आणि आता एक कावडी घरा मध्ये तेथे ठेवा जेथे तुम्ही पैसे ठेवता आणि दुसरी कवडी आपल्या सोबत खिशामध्ये नेहमी सोबत ठेवा. हा उपाय केल्यामुळे तिजोरी कधी रिकामी होणार नाही नेहमी पैश्याने भरलेली राहील आणि खिशात देखील पैसे राहतील.

वरील उपाय हा श्रध्दा पूर्वक करण्यासाठी आहे ज्यांच्या मना मध्ये विश्वास आणि श्रध्दा नाही त्यांना हे सर्व अंधश्रद्धा वाटू शकते. त्यामुळे ज्यांना वरील उपाय पटत नसतील त्यांनी अंधश्रद्धा म्हणून दुसऱ्याच्या श्रद्धेचा आणि भावनांचा अपमान करू नये. तुमच्यासाठी ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दुसऱ्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

Tags

Related Articles

Back to top button