lovePeopleviral

पती-पत्नीचे नाते अटूट असते, फक्त 1 गोष्ट त्यांना वेगळे करू शकते

पती-पत्नी रोज एकत्र ठरलेल्या वेळी एकाच ट्रेन मध्ये प्रवास करत होते. एक तरुण अजून होता, तो देखील त्याच ट्रेन मधून प्रवास करत असे, तो पती-पत्नीला दररोज पाहत असे. ट्रेन मध्ये बसून पती-पत्नी भरपूर गप्पा मारत असत. पत्नी गप्पा करतांना स्वेटर विणत होती.

त्या दोघांची जोडी एकदम परफेक्ट होती. एक दिवस जेव्हा पती-पत्नी ट्रेन मध्ये नाही आले तेव्हा त्या तरुणास थोडे आश्चर्य वाटले, कारण त्याला रोज त्यांना पाहण्याची सवय झाली होती. जवळपास 1 महिना पती-पत्नी ने त्या ट्रेन मधून प्रवास नाही केला. तरुणास वाटले कदाचित ते बाहेरगावी गेले असावेत. पण अचानक एक दिवस तरुणाने पाहिले पती एकटाच ट्रेन मधून प्रवास करत आहे आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी नाही आहे. पतीचा चेहरा देखील उतरलेला वाटत होता, कपडे अस्तव्यस्त आणि दाढी वाढलेली होती.

तरुणास राहवले नाही आणि त्याने पतीला जाऊन विचारले कि आज तुमच्या सोबत तुमची पत्नी नाही आहे. पतीने प्रतिक्रिया दिली नाही. तरुणाने पुन्हा एकदा विचारले तुम्ही इतक्या दिवस कुठे होता, कुठे बाहेर गेले होता का? यावेळी देखील पतीने प्रतिक्रिया दिली नाही. युवकाने पुन्हा एकदा पत्नी बद्दल विचारले. पतीने उत्तर दिले- ती आता या जगात नाही, तिला कैंसर होता.

 

हे ऐकून तरुणाला झटका लागला. पण स्वताला सांभाळून त्याने अधिक विचारपूस केली. पतीने तरुणाला सांगितले कि पत्नीला लास्ट स्टेज कैंसर होता, डॉक्टरांनी देखील हात टेकले होते. हि गोष्ट तिला देखील माहीत होती, पण तिचा हट्ट होता कि आपण जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवावा. त्यामुळे जेव्हा मी ऑफिस मध्ये जात असे तेव्हा ती देखील माझ्या सोबत ऑफिस मध्ये येत असे आणि नंतर ती घरी निघून जात असे. मागील महिन्यातच तिचा मृत्यू झाला. एवढे बोलून पती शांत झाला.

ठरलेल्या स्टेशनवर पती ट्रेन मधून उतरला. अचानक तरुणाचे लक्ष त्याच्या स्वेटर कडे गेले. त्याने पाहिले कि हा तर तोच स्वेटर आहे ज्यास त्याची पत्नी ट्रेन मध्ये विणत होती, त्याची एक बाजू अजूनही अर्धवट होती, कदाचित त्याची पत्नी ती बाजू पूर्ण करण्या अगोदरच गेली होती. पती-पत्नीचे प्रेम त्या स्वेटर मध्ये दिसून येत होते.

लाइफ मेनेजमेंट

पती-पत्नीचे नाते अतूट असते, फक्त मृत्यूच त्यांना वेगळे करू शकते. पत्नी आपल्या पतीचा प्रत्येक सुख-दुःखा मध्ये साथ देऊ इच्छिते. हाच या नात्यातील सगळ्यात सुंदर अनुभव आहे. त्यामुळे सोबत असताना आनंदाने जीवन जगावे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close