Hair Care

या 5 सवयीमुळे लोकांना पडत आहे टक्कल, तुम्हाला पण नाहीत ना या सवयी

आज आपण लोकांच्या कोणत्या वाईट सवयीमुळे त्यांना टक्कल पडले आहे हे पाहणार आहोत आणि त्यांच्या चुकांमधून आपण शिकून आपण आपल्याला टक्कल पडण्या पासून कसे वाचवता येईल ते शिकणार आहोत. आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक कळतनकळ सवयी असतात ज्या आपल्याला किती वाईट आहेत यांचा अंदाज देखील येत नाहीत. परंतु त्यांचा परिणाम झाल्या नंतर आपल्याला कळते की आपल्या सवयीमुळे हे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून आज आपण येथे काही वाईट सवयी बद्दल चर्चा करणार आहोत जी आपल्या केसांवर वाईट परिणाम करतात.

केसांना कोमट पाण्याने धुणे

जर तुम्ही थंडीच्या दिवसात आपले केस गरम पाण्याने धुता तर तुमचे केस कमजोर होऊ शकतात आणि वेगाने गळण्यास सुरुवात होऊ शकतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात आणि कोणत्याही वेळी केस धुताना शक्य असेल तेवढे नॉर्मल पाण्याने केस धुण्याची सवय लावून घ्या. असे केल्यामुळे तुमचे केस गळणार नाहीत.

कंगवा न करणे

तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी रात्री झोपण्याच्या अगोदर महिला असो किंवा पुरुष दोघांना देखील केसांना कंगवा करून झोपले पाहिजे. असे केल्यामुळे तुम्ही तुमच्या केसामधील गुंथा काढता आणि ते एकमेकात गुंतून तुटण्या पासून वाचतात. जर तुम्ही रात्री बिना कंगवा करता झोपले तर सकाळी उठल्यावर जेव्हा कंगवा करता तेव्हा ते केस जास्त गुंथा झालेले असतात आणि जास्त तुटतात आणि कमजोर होतात.

केसांना न झाकणे

उन्हाळ्याच्या मौसमात जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाता तेव्हा ऊनात केसांना कपड्याने झाकून निघावे. जर तुम्ही असे केले नाहीतर तुमच्या केसांची मुळे कमजोर होतात ज्यामुळे केस गळतात आणि तुम्हाला टक्कल पडते.

टॉवेलचा वापर

हे महिलांमध्ये पाहण्यात आलेले आहे की त्या जेव्हा अंघोळ करून बाहेर निघतात तेव्हा त्या आपल्या केसांना टॉवेलने लपेटून किंवा कसून बांधून बाहेर पडतात. असे केल्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात आणि केस वेगाने गळतात. त्यासाठी अश्या प्रकारची चूक करू नये.

ब्लो ड्रायरचा वापर करून आपल्या केसांना सुकवणे

मुली बहुतेक वेळा आपले केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करतात, पण तुमच्या माहीतीसाठी ब्लो ड्रायरचा अतिरिक्त वापर तुमच्या केसांना डेड करतो, आणि त्यांची मुळे कमजोर करतो ज्यामुळे तुमचे केस भरपूर तुटायला लागतात. यासाठी ब्लो ड्रायरचा वापर अत्यंत कमी म्हणजे अत्यावश्यक असेल तेव्हाच करा.


Show More

Related Articles

Back to top button