महिला पोलीस ऑफिसर आपले सगळे केस काढले, कारण जाणून घेतल्यावर अभिमान वाटेल

0
14

केरळ मधील थिस्सूर जिल्ह्या मध्ये महिला ऑफिसर पदावर काम करणारी अपर्णा लवकुमार हल्ली सोशल मीडियावर स्टार झाली आहे. कारण आहे तिने केलेलं एक खास काम जे लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. खरंतर 46 वर्षांची अपर्णाला ने आपल्या डोक्यावरील सगळे केस काढले आहे. असे तिने कैन्सर रुग्नांच्या मदतीसाठी केले आहे. आपल्या माहितीसाठी कैन्सरच्या उपचारात केमियोथेरपी होते ज्यामुळे रुग्नाच्या डोक्यावरील केस वेगाने गळतात. याचा रुग्णाला मानसिक धक्का देखील बसतो. त्यामुळे अपर्णा आपले केस कैन्सर पीडित रुग्नासाठी विग बनवण्यासाठी दान करू इच्छित होती. अपर्णा चे केस लांब होते जे तिने एक चांगल्या कामासाठी दान केले. आता या कारणामुळे देशभरातून लोक तिचे प्रशंसा करत आहेत.

बॉलीवूड ऐक्ट्रेस अनुष्का शर्मा देखील अपर्णाच्या या कामाने प्रभावित झाली आहे. तिने इन्स्ताग्राम वर अपर्णाच्या फोटो सोबत स्टोरी शेयर केली आहे आणि तिला सलाम केला आहे. रिपोर्ट अनुसार अपर्णाला ने मागील मंगळवारी आपले केस दान केले होते. हिंदुस्तान टाइम्स सोबत बातचीत करताना तिने सांगितलं कि असे लहान मोठया कामांना मी प्रशंसा करण्या लायक मानत नाही. मी जे केले त्यामध्ये काहीही मोठे नाही होते. माझे केस दोन वर्षाच्या आत पुन्हा परत येतील. माझ्या मते तर खरे हिरो ते आहेत जे अंग दान करतात. केसांमुळे फक्त सौंदर्य प्रभावित होते. सौंदर्यात काही ठेवलं नाही आहे. आपलं काम जास्त महत्वाचं आहे.

आपल्या माहितीसाठी हे काही पहिल्यांदा नाही आहे कि अपर्णा ने समाजसेवेच्या संबंधित काही काम केले आहे. याअगोदर 10 वर्षा पूर्वी देखील ती चर्चेचे कारण बनली होती. तेव्हा एका गरीब कुटुंबाकडे हॉस्पिटल मधून शव घरी घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते. अश्या वेळी अपर्णा ने आपल्या सोन्याच्या तीन बांगड्या दान केल्या होत्या. जेव्हा अपर्णाला विचारले गेले कि तिला केस कापण्याचा विचार कसा आला तेव्हा ती म्हणाली तसेतर मी नेहमीच आपले थोडे थोडे केस दान करत असते पण यावेळी मी सगळेच केस दान केले. खरंतर मी एक 5 वी क्लासच्या कैन्सर पीडित मुलाला पाहिलं होत. त्याचे सगळे केस गळाले होते. मी त्याच्या दुःखाची जाणीव समजू शकत होती. बस तेव्हाच मी आपल्या जिल्हा पोलीस चीफ आयपीएस एन. विजयकुमार यांच्याकडून केस काढण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी ती परवानगी दिली.

केरळ मध्ये पोलीस मैनुअल मध्ये वर्दी (पोशाख) रिलेटेड काही नियम आहेत. यामध्ये पुरुषांना आपली दाढी वाढवणे आणि डोके सेव करण्याची परवानगी नाही आहे. हाच रुल महिलांना देखील लागू आहे. परंतु अपर्णा ने जेव्हा एन. विजयकुमार यांना डोके सेव करण्याचे कारण सांगितलं तेव्हा ते खुश झाले आणि त्यांनी याची परवानगी दिली. त्यांनी सांगितलं कि याची परवानगी देतांना मला आनंद होत आहे. हे सगळे प्रकरण प्रसिद्धी मध्ये तेव्हा आले जेव्हा एक स्थानिक पार्लर ने अपर्णाच्या केसांची ही स्टोरी सोशल मीडियावर शेयर केली.