सलाम : शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी सैन्यदलात भरती होणार

सिंधुदुर्गचे वीर जवान शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पतीची शत्रूशी लढण्याची इच्छा आपण पूर्ण करणार असे त्यांनी म्हंटले आहे.

कौस्तुभ यांच्या पहिल्या स्मृतिदिनी कनिका राणे यांना लष्कराकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. सैन्यात प्रशिक्षण घेण्यासाठी ते ऑक्टोबरमध्ये रुजू होणार आहेत. अधिकारी पदाच्या परीक्षेत चांगले यश मिळवल्याने वीरपत्नी कनिका यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

आपल्या माहितीसाठी शहीद जवान कौस्तुभ राणे यांना 7 ऑगस्ट 2018 रोजी वीरमरण आले होते. घुसखोरांच्या सोबत लढताना त्यांना वीरमरण आले होते. शहीद जवान कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका यांना राज्य सरकारने सरकारी नोकरी देऊ केली होती परंतु कनिका यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.

सिंधुदुर्गचे वीर जवान शहीद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पतीची शत्रूशी लढण्याची इच्छा आपण पूर्ण करणार असे त्यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here