money

कैटरिना कैफ ने खरेदी केलेली रेंज रोवर वॉग एसयुवी – जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

बॉलिवूड स्टार्स आणि महागड्या ब्रॅण्डेड कार हे नाते जुने आहे. बॉलिवूडच्या स्टार्सना महागड्या कार्सचे आकर्षण नेहमीच राहिले आहे आणि हे त्यांच्या फायद्याचे देखील आहे कारण यामुळे त्यांचा रुबाब, आकर्षण आणि लोकांच्या डोळ्यात पटकन स्वताला दाखवण्यासाठी हे त्यांच्यासाठी आवश्यक देखील आहे. पण आज आपण बोलणार आहोत कैटरिना कैफ ने खरेदी केलेल्या नवीन रेंज रोवर एसयूवी बद्दल. कैटरिना ने वॉग SE डिजल LWB मॉडल विकत घेतले आहे ज्याची किंमत 2.33 करोड रुपये (एक्स शोरूम) आहे.

कैटरिना ने खरेदी केलेल्या नवीन एसयूवी बद्दल बोलायचे झाले तर या नवीन कारचा रंग पांढरा आहे. हि कार या प्राइस रेंज मध्ये सगळ्यात चांगली एसयूवी असल्याचे बोलले जाते. कैटरिना ने यासाठी आपली जुनी कार ऑडी Q7 चा नंबर घेतला आहे.

रेंज रोवर वॉग एसयूवी चे इंजिन 4.4 लिटर SDV8 डिजल इंजन लावलेले आहे जे 3500 आरपीएम वर 335 बीएचपी पॉवर आणि 1750 आरपीएम वर 740 एनएम चे टॉर्क प्रदान करते.

या कार मध्ये लग्जरी इंटिरियर दिलेले आहेत. कैटरिना कैफ ने लॉन्ग व्हील बेस (LWB) वैरिएंट विकत घेतले आहे. हा सामान्य एसयूवी चे लांब वर्जन आहे ज्यामुळे अधिक आराम मिळण्यासाठी अधिक जागा मिळू शकेल. याचे डिजाइन अत्यंत आकर्षक ठेवले आहे.

करीना कपूर, शाहरुख खान हे बॉलिवूड स्टार्स देखील रेंज रोवर मध्ये फिरतात. रेंज रोवर आवडण्याची अनेक कारणे आहेत जसे याची ब्रॅण्ड वैल्यू, याचे सिम्पल पण कैची लूक सगळ्यांना आकर्षित करते.

दमदार इंजन सोबत लग्जरी असे कॉम्बिनेशन असल्याने या एसयूवी कडे लोक आकर्षित होतात. रेंज रोवर एक विश्वासार्ह ब्रॅण्ड मानला जातो. तसेच यांच्या कार्स मजबूत असतात. या कारचा व्यवस्थित राखराखाव केला तर या क्वचितच खराब होतात.

रेंज रोवर वॉग एसयूवी ची एक्स शोरूम प्राइज 2.33 करोड रुपये असली तरी खरेदी केल्यास अजून जास्त महाग ठरू शकते. आशा आहे एक्ट्रेस ने कंपनी द्वारे उपलब्ध करून दिलेल्या अन्य एक्सेसरीज देखील कार मध्ये लावल्या असतील ज्यामुळे कारच्या किमती मध्ये वाढ होऊ शकते.

कशी वाटली कैटरिना कैफ ने खरेदी केलेली नवी कार ही नवी कार तिच्या रुबाबा मध्ये नक्कीच भर घालणारी आहे एवढे मात्र आपण बोलू शकतो.

आशा आहे तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर ही पोस्ट लाईक आणि शेयर करण्यास विसरू नका तसेच आमचे फेसबुक पेज अजूनही तुम्ही लाईक केले नसेल तर त्यासही लाईक करा कारण अश्याच दर्जेदार पोस्ट आम्ही नेहमी शेयर करत असतो.

Show More

Related Articles

Back to top button
Close