तैमूरच्या या गोष्टीने वाईट वाटत करीनाला, स्वतः करीना सांगते

अनेक दिवस झाले करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर बद्दल काहीच बातमी मीडिया मध्ये आलेली नाही. लोक जरी तैमूरच्या बातम्यांना कंटाळले असले तरी आवडीने वाचतात देखील. तैमूरला एक पॉप्युलर स्टारकीड म्हणून प्रसिद्ध आहे. सैफ आणि करीना आपल्या व्यस्त टाइम शेड्युल्ड मधून देखील तैमूरसाठी वेळ काढतात आणि त्याच्या सोबत काही वेळ व्यतीत करतात.

करीना सांगते कि तैमूर आता जसा मोठा होतोय तसे तो अनेक प्रश्न विचारत आहे. करीना ने सांगितलं कि जेव्हा ती कामा निमित्त घरा बाहेर पडते तेव्हा तैमूर तिला म्हणतो कि, ‘अम्मा मत जाओ.’ तैमूरचे हे वाक्य ऐकून करीना सांगते मला अतिशय वाईट वाटत.

करीना ने सांगितलं कि बहुतेकदा घरा बाहेर निघताना ती तैमूर ला बाय बोलणे विसरते. करीना ने सांगितले कि तैमूर तिला अम्मा म्हणतो तर सैफला अब्बा म्हणून आवाज देतो.

हल्लीच करीना, तैमूर आणि सैफ यांना मुंबई एयरपोर्ट वर पाहण्यात आले होते. असे बोलले जात आहे कि करीनाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी संपूर्ण कुटुंब बाहेर गेले आहे.

करीना ने हल्लीच आपल्या गुड न्यूज या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये ती अक्षय कुमार सोबत दिसून येईल. याच सोबत इतर अनेक फिल्म देखील करीना करत आहे.

सैफ अली खान देखील लाल कप्तान या त्याच्या फिल्म मधून आपल्याला दिसून येईल यामध्ये तो साधू च्या भूमिकेत दिसेल. तसेच तानाजी अनसंग वॉरियर आणि जवानी जानेमन या फिल्म मधून देखील आपल्या भेटीला येणार आहे.