astrology

चुकूनही आपल्या सोबत ठेवू नका या 5 वस्तू अन्यथा बनाल कंगाल

या जीवनचक्रा मध्ये सुख-दुख आहेत हे सर्वांना माहीत आहे, सोबत हे पण माहीत आहे की जसे आपले कर्म असतात त्याच पद्धतीने आपल्याला त्याची फल प्राप्ती होते. पण तरीही दैनंदिन जीवनामध्ये आपण असे काही कामे करतो ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो किंवा चांगला परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या जीवनामध्ये सुख-शांती असावी आणि जीवन आनंदाने भरपूर असावे. पण ज्योतिष शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या वस्तूंना तुम्हाला आपल्या सोबत ठेवले नाही पाहिजे अन्यथा तुमच्या जीवना मध्ये अनेक समस्या उत्पन्न होऊ शकतात आणि तुम्ही पूर्णपणे कंगाल होऊ शकता. चला पाहू या वस्तू कोणत्या आहेत.

की रींग वर कोणत्याही देवाचा फोटो किंवा मूर्ती

सहसा आपण पाहिले असेल की लोक आपल्या की रिंग मध्ये देवाचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. पण असे केले नाही पाहिजे कारण रिंग अनेक वेळा आपल्या हातातून खाली पडते तसेच आपले हात सतत खराब जागी लागत असतात त्यानंतर त्याच हाताने आपण त्या पवित्र वस्तुना स्पर्श करणे देवी देवतांचा अपमान ठरतो. ज्यामुळे आपल्या जीवनात सुख=समृद्धी नाही येत.

आपल्या पर्स मध्ये लक्ष्मी कुबेर ठेवू नका

असे अनेकवेळा पाहिले गेले आहे की लोक आपल्या पर्स मध्ये बरकत येण्यासाठी लक्ष्मी देवीचा फोटो किंवा कुबेराचा फोटो ठेवतात. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. कारण जेव्हा आपण पर्स आपल्या पेंटच्या खिशात ठेवतो तेव्हा तो आपल्या नाभीच्या खालचा भाग होतो. शास्त्रानुसार नाभीच्या खालील भागाला अशुध्द मानले गेले आहे तसेच आपले पर्स चामड्याचे असतात किंवा अन्य पदार्थाचे असतात, जे धार्मिक दृष्टीने पवित्र मानले जात नाहीत यासाठी पर्स मध्ये या वस्तू ठेवू नयेत.

कोणत्याही देवाची अंगठी

अंगठी घालण्याची हौस अनेक लोकांना असते पण अनेक वेळा पाहिले गेले आहे की लोक देवी देवतांचे चित्र असलेली अंगठी आपल्या बोटांमध्ये घालतात. पण आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर ही चूक तुम्ही देखील करत असाल तर असे करू नका कारण असे करणे अशुभ मानले जाते. यामागील कारण असे आहे की जेव्हा आपण भोजन करतो किंवा दुसरे काम करतो तेव्हा आपले हात उष्टे होतात आणि अपवित्र राहतात ज्यामुळे अंगठीवर असलेल्या देवतांचा अपमान होतो. ज्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो त्यामुळे अश्या अंगठ्या घालू नयेत.

गाडी मध्ये देवाची मूर्ती

जेव्हा आपण कोठेही ट्रैवल करतो तेव्हा आपण आपल्या पर्सनल गाडीमध्ये देवी देवतांची मूर्ती ठेवतो. परंतु कधीही असे करू नका. कारण आपण यामूर्तींची पूजा करू शकत नाहीत आणि या मूर्तींना धूप अगरबत्ती दाखवू शकत नाहीत, ज्यामुळे देवी देवतांचा अनादर होतो आणि यामुळे आपल्याला याचे शुभ फल प्राप्त होत नाहीत. जर तुम्ही आपल्या गाडीमध्ये देवी देवतांची मूर्ती ठेवत असाल तर नियमित रूपाने त्यांची पूजा करावी अन्यथा याची शुभफलप्राप्ती होत नाही.

कोणतीही टोकदार वस्तू

जर तुम्ही आपल्या सोबत कोणतीही टोकदार वस्तू किंवा धारदार वस्तू जसे ब्लेड, चाकू किंवा नेलकटर इत्यादी ठेवत असाल तर ही सवय बदला. कारण असे केल्यामुळे तुमच्या आसपास किंवा तुमच्या आतमध्ये नकारात्मक उर्जा प्रवाह जास्त होतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नुकसान सहन करावे लागते.


Show More

Related Articles

Back to top button