Connect with us

काळी मिरीचा उत्तम उपाय, तुम्हाला बनवू शकतो धनवान आणि इतरही समस्यांचे होईल समाधान

Astrology

काळी मिरीचा उत्तम उपाय, तुम्हाला बनवू शकतो धनवान आणि इतरही समस्यांचे होईल समाधान

आज आपण येथे काळी मिरी वापरून धनवान आणि सुखमय जीवन मिळवण्यासाठी उपाय पाहणार आहोत. त्यापूर्वी काळी मिरी आपल्या कोणकोणत्या कामी उपयोगी येते ते पाहू.

जवळपास सगळ्याच घरांच्या स्वयंपाकघरात काळी मिरी असते सामान्य पणे आपण काळी मिरी मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरतो. काळी मिरी आपल्याला अनेक आरोग्य विषयक फायदे देखील देते. हिच्या मुळे आपली पचनशक्ती चांगली राहते. काळी मिरी सेवन केल्यामुळे कैंसर सारख्या गंभीर आजारा पासून देखील वाचता येते. सर्दी-खोकल्या मध्ये देखील फायदेशीर असते.

ज्योतिषशास्त्रा मध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत ज्यांना केल्यामुळे जीवन सुखमय होऊ शकते. तुमच्या जीवनामध्ये अडलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतात, तुम्हाला समस्यांपासून सुटका मिळू शकते. एवढेच नाही तर जीवनामध्ये धनाच्या संबंधित समस्या दूर होऊ शकते. हा सोप्पा उपाय तुम्हाला धनवान बनवू शकतो. तुमच्या स्वयंपाकघरात असलेली काळी मिरी तुमचे भाग्य बदलू शकते.

काळी मिरीचे उपाय

जर तुम्ही आपल्या घरातून एखाद्या महत्वाच्या कामासाठी घरा बाहेर जात असाल तर घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर घराच्या मुख्य दरवाजावर काळी मिरी ठेवा आणि त्याच काळी मिरीवर पाय ठेवून घराच्या बाहेर पाऊल ठेवा. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही ज्या कार्यासाठी जात असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल पण तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल कि हा उपाय एकदा केल्यानंतर पुन्हा घरा मध्ये प्रवेश करू नका अन्यथा या उपायाचा प्रभाव समाप्त होईल.

जर तुम्हाला श्रीमंत बनायचे असेल तर काळी मिरीचे 5 दाणे घ्या आणि त्यांना आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरावा आणि त्यांनंतर एखाद्या चौकामध्ये किंवा निर्जन ठिकाणी उभे राहून चारी दिशांना चार दाणे फेका यानंतर पाचवा दाना वर आकाशात फेका त्यानंतर पुन्हा घरी जावे. एक गोष्ट लक्षात ठेवा घरी येताना मागे वळून पाहू नका. असे मानले जाते कि हा उपाय केल्याने अचानक धन लाभ होण्याचे योग बनतात.

जर तुम्ही शनीच्या वाईट प्रभावाने वाचू इच्छित असाल तर यासाठी काळ्या कपड्यामध्ये काळी मिरी आणि पैसे बांधून दान करा. जर हा उपाय केला तर शनीच्या साडेसातीची समस्ये पासून सुटका होते.

जर तुम्ही घरातील नकारात्मक उर्जे पासून सुटका मिळवू इच्छित असाल तर काळी मिरीचे 7-8 दाणे घ्या. त्यांना घरातील एका कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवून जाळा. या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो म्हणजे 5 ग्राम हिंग आणि 5 ग्राम कापूर सोबत 5 ग्राम काळी मिरी एकत्र मिश्रण करून नंतर त्याच्या बारीक मोहरी एवढ्या गोळ्या बनवा जेवढ्या बनवा आणि जेवढ्याही गोळ्या झाल्या असतील त्यांना दोन भागात विभागून सकाळ आणि संध्याकाळी जाळा. हा उपाय तीन दिवस करावा. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल. या उपायाने वाईट नजर आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top