कादर खान यांचे करियर खराब होण्याच्या कारणा मागे अमिताभ बच्चन होते, जाणून घ्या असे काय झालं होत

0
38

हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये काही असे कलाकार झाले जे चित्रपटा मध्ये लीड एक्टर जरी नसले तरी व्हिलन, कॉमेडी, सपोर्ट इत्यादी भूमिका मध्ये सगळ्यांची मने जिंकायची. कादर खान देखील या पैकीच एक होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर मध्ये अनेक हिट फिल्म मध्ये काम केले. लोक कादर खान यांना कॉमेडी सोबतच सिरीयस आणि व्हिलनच्या रोल मध्ये देखील पसंत करत होते. अत्यंत कमी लोकांना माहीत आहे कि कादर खान हे उत्तम अभिनेता असण्या सोबतच एक उत्तम दर्जाचे डायलॉग रायटर देखील होते. त्यांनी आपल्या करियर ची सुरुवात संवाद लेखक म्हणून केली होती. आज या पोस्ट मध्ये आपण त्यांच्या जीवनातील अमिताभ बच्चन यांच्या बद्दलचा एक किस्सा जाणून घेणार आहोत.

असे बोलले जाते कि अमिताभ बच्चन यांचे करियर उंचावर घेऊन जाण्या मागे कादर खान यांचा हात होता तर कादर खान यांचे करियर बुडवण्या मागे अमिताभ बच्चन यांचा हात होता. काही वर्षा पूर्वी कादर खान आपल्या जुन्या पत्रकार मित्रांसोबत बसून गप्पा मारत होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बद्दल विषय निघाला. अमिताभचे नाव ऐकताच कादर खान एकदम गप्प झाले, नंतर त्यांच्या तोंडून जे निघाले ते ऐकल्या नंतर सगळ्यांना आश्चर्य वाटले. कादर खान यांनी सांगितले कि, “जर मी अमित ला सर जी म्हणणे सुरु केले असते तर माझे करियर समाप्त झालं नसत.” चला जाणून घेऊ या बोलण्या मागे काय कारण..

खरंतर दक्षिण भारतातील एक प्रोड्युसर कादर खान यांना संवाद लेखक म्हणून घेणार होते. फिल्मच्या प्रोड्युसर ने त्यांना सांगितलं कि तुम्ही एकदा ‘सर जी’ सोबत बोलून घ्या. यावर कादर खान म्हणाले ‘कोण सर जी?’ तेव्हा निर्माता म्हणाले ‘अरे तुम्ही सर जी ला ओळखत नाही. अमिताभ बच्चन.’ त्यावर कादर खान यांनी उत्तर दिले ‘हा सर जी केव्हा पासून झाला?’

खरंतर तेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी अमिताभ यांना सर जी म्हणून बोलणे सुरु केलं होत पण कादर यांचे म्हणणे होते कि मी अमित ला सर जी नाही बोलणार. मी माझ्या घरातल्यांना किंवा मित्रांना कधी ‘जी’ नाही बोलत. बस त्यामुळे कादर खान यांच्या हातून अमिताभ बच्चन यांना घेऊन बनत असलेल्या अनेक फिल्म निघून गेल्या. या फिल्म मध्ये कादर खान संवाद लेखक किंवा एक्टर म्हणून काम करणार होते. पण त्यांना कशातच काम नाही मिळाले कारण ते अमिताभ यांना सर जी नाही बोलू इच्छित होते. या फिल्म मध्ये खुदा गवाह आणि गंगा जमना सरस्वती सहित अनेक फिल्मचा समावेश होता.

आपल्या माहितीसाठी हे सगळे होण्याच्या अगोदर अमिताभ बच्चन यांच्या अनेक फिल्मसाठी दमदार डायलॉग लिहिले होते. अमिताभ बच्चन यांच्या दमदार डायलॉग मागे कादर खान यांचे संवाद लेखन होते त्यामुळे अमिताभचे करियर उंचावर जाण्यास हातभार लागला. पण नशिबाची थट्टा ही आहे कि अमिताभ यांच्या नावा पुढे जी लावले नाही म्हणून कादर खान यांचे करियर खराब झाले. पण एक गोष्ट सगळेच मान्य करतील कि कादर खान यांच्या सारखे दमदार डायलॉग लिहिणार दुसरा कोणीही फिल्म इंडस्ट्री मध्ये झाला नाही. त्यांचे योगदान फिल्म इंडस्ट्री मध्ये मोठे आहे.