Connect with us

या उपायाने सकाळी बसल्यावर सर्व पोट होईल साफ, गैस निघून जाईल, दिवसभर रहाल फ्रेश

Food

या उपायाने सकाळी बसल्यावर सर्व पोट होईल साफ, गैस निघून जाईल, दिवसभर रहाल फ्रेश

बद्धकोष्ठ म्हणजे काय?

बद्धकोष्ठ (constipation) म्हणजे मल-त्याग न होणे, मल-त्याग कमी होणे, पोट साफ न होणे, रोज पोट साफ न होणे आणि इतर या संबंधीच्या समस्यांना बद्धकोष्ठ म्हणजेच constipation म्हणतात.

Constipation हे कोणत्याही वयात होऊ शकते आणि कधीही होऊ शकते. Constipation एक अशी समस्या आहे ज्यावर वेळीच उपाय केला नाही तर पोट दुखी आणि पोटा मध्ये असह्य वेदना होणे हा त्रास होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठ (Constipation) चा उपाय सांगत आहोत.

Constipation होण्याचे कारण?

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वेळेवर न जेवणे, शिळे आणि जास्त चीकनाईवाले अन्न खाणे, मैदा इत्यादी, जेवणात फायबरची कमी, कमी झोप, मानसिक तणाव, आतड्यांची कमजोरी, कमी पाणी पिणे, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, जास्त रागावने, दुख, आळस इत्यादी कारणे असू शकतात.

Constipation आणि पोटातील गैसचे इतर कारणे देखील असू शकतात. जसे आपल्या अन्नाचे योग्य पचन न होणे, जेवल्यानंतर बसून राहणे इत्यादी कारणे Constipation होण्याची असू शकतात. येथे आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी काही उपाय सांगत आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही Constipation च्या त्रास पासून मुक्ती मिळवू शकता.

Constipation आणि पोटाच्या गैसचे उपाय

1) कोथिंबीर Constipation च्या आजारात फायदेशीर आहे. कोथिंबीरच्या चूर्णामुळे जुन्यातला जुना बद्धकोष्ठ दूर होतो. यासाठी 50 ग्राम कोथिंबीर, 10 ग्राम सुंठ, 2 चिमुट काळेमीठ तसेच 3 ग्राम हरड घेऊन सर्व एकत्र करून बारीक पावडर करा आणि कपड्याने गाळून घ्या. जेवण झाल्यानंतर थोडेसे चूर्ण कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठ ठीक होते आणि पोट स्वच्छ होते. यामुळे पोटदुखी कमी होते आणि आतड्यांना आराम मिळतो. यामुळे भूक लागते. मलावरोध समाप्त होतो. जर जुनाट Constipation असेल तर दररोज 40 दिवस हे चूर्ण घ्यावे. Constipation नसेल तरीही हे चूर्ण घेतले जाऊ शकते. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

2) त्रिफलाचे चूर्ण 5 ग्राम हलक्या गरम पाण्यात मिक्स करून रात्री झोपण्याच्या अगोदर घेतल्यामुळे Constipation समाप्त होते.

3) ओवा (अजवायन) 10 ग्राम, त्रिफला 10 ग्राम आणि सेंधवमीठ 10 ग्राम सम प्रमाणात एकत्र घेऊन बारीक पावडर करावी. दररोज 3 ते 5 ग्राम हे चूर्ण कोमट पाण्यात मिसळून रात्री झोपण्या अगोदर प्यावे यामुळे Constipation समाप्त होते.

4) रोज 10 मनुके गरम दुधात उकळून खाण्यामुळे फायदा होतो.

5) सुक्या आवळ्याचे चूर्ण रोज 1 चमचा जेवण झाल्या नंतर घेतल्याने फायदा होतो. किंवा 1 चमचा आवळा चूर्ण मधा सोबत रात्री घ्यावे.

6) गुलबेल (गिलोय) चे चूर्ण 1 चमचा गुळा सोबत खाण्यामुळे Constipation मध्ये आराम मिळतो.

7) पोटात गैस झाला असेल तर सकाळी 4 पाकळ्या लसून खावे यामुळे पचन शक्ती वाढते आणि गैस दूर होतो.

8) देसी घी मध्ये काळी मिरी मिसळून गरम दुधा मध्ये घी सोबत पिण्यामुळे आतड्यामध्ये थांबलेले मल नरम आणि ढीले होते आणि बाहेर निघून जाते.

9) जेष्ठमध 5 ग्राम कोमट दुधा सोबत झोपण्या अगोदर घेतल्यास सकाळी पोट साफ होते.

10) लिंबाचा रस, 5 मिलीलीटर अद्रक रस आणि 10 ग्राम मध एकत्र करून गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे Constipation समाप्त होते.

Constipation पासून वाचण्यासाठी असे करा भोजन

डाळी मध्ये मुंग आणि मसूर डाळ, भाजी मध्ये कमीतकमी मिरची आणि मसाले टाकून बनवलेली पडवळ, तोंडली, दुधीभोपळा, पालक, बटाटे आणि मेथी इत्यादी खावे. अर्ध्याहून जास्त चोकर (गव्हाच्या पिठातील कोंडा) मिश्रित गहू किंवा जवाची भाकरी/चपाती खावी. भरपेट जेवू नये थोडे कमीच खावे. आंबा, आवळा, द्राक्षे, पेरू, अंजीर, किशमिश आलुबुखार, संत्रे, खरबूज, टमाटर, लिंबू इत्यादी खावे. दिवसभरात 6-7 ग्लास पाणी आवश्य प्यावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मुळव्याध पासून 1 दिवसात आराम देणारा आणि 3 दिवसात ठीक करणारा रामबाण उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top